bacchu kadu in akola.jpg 
विदर्भ

बच्चू कडूंचा ताफा अडविला; मग घडले असे...

सकाळ वृत्तसेवा

अकोला : पालकमंत्री बच्चू कडू गुरुवारी आपल्या नियोजित दौऱ्यावर अकोल्यात आले होते. एमआयडीसीतील कार्यक्रम आटपून ते पुढील कार्यक्रमासाठी जात असताना डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वारासमोर पालकमंत्री बच्चू कडूचा ताफा अडविला. 

यावेळी कृषी पदव्युत्तर पदवी व आचार्य पदवी अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित करणे व शैक्षणिक व इतर शुल्क वस्तीगृह शुल्कासह कमी करून बंद झालेली शिक्षक सवलती सुरू करण्याची मागणी दरम्यान विद्यार्थ्यांनी उपस्थित केली. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर मुख्य मार्ग असल्यामुळे ताफा अडविल्याने येथे काही काळासाठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. जलसंपदा व लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालकल्याण राज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे गुरुवारी अकोला दौऱ्यावर आहेत. 

बच्चू कडू हे स्वतः गाडीतून उतरले
दुपारी तीन वाजताच्या सुमारास एमआयडीसी असोसिएशनचा कार्यक्रम आटपून ते एका खासगी कार्यक्रमाला निघाले होते. दरम्यान, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासमोर पंधरा ते वीस विद्यार्थ्यांनी त्यांच्या वाहनासमोर जाऊन ताफा अडविला. यावेळी विद्यार्थी असल्याचे पाहून पालकमंत्री बच्चू कडू हे स्वतः गाडीतून उतरले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या काय मागण्या आहेत, त्या समजून घेतल्या आणि यासाठी आपण राज्य शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. अमरावती-अकोला मुख्य मार्ग असल्यामुळे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर ताफा अडविण्यात आल्याने येथे काही काळासाठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT