railway 
विदर्भ

हे आहेत बडनेरा-भुसावळ पॅसेंजरमधील नवे बदल.... जाणून घ्या

सकाळवृत्तसेवा

अमरावती : प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्यरेल्वेने भुसावळ- बडनेरा मार्गावर मेमू ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. लोकलच्या धर्तीवर ही पॅसेंजर ट्रेन प्रवाशांच्या पसंतीस उतरत आहे. यापूर्वी अमरावती-नागपूर मार्गावर ही ट्रेन सुरू झाली. 1 फेब्रुवारीपासून बडनेरा-भुसावळ मार्गावर नव्या मेमू लूकमध्ये ही ट्रेन धावेल. गाडी क्रमांक (51183- 51184 अप-डाऊन) भुसावळ -नरखेड पॅसेंजर या गाडीचा नंबर बदलून (61101-61102) असा नवीन ठेवण्यात आला आहे.

गाडी क्रमांक (61101-डाऊन) भुसावळ -बडनेरा ही ट्रेन 1 फेब्रुवारीपासून नव्या मेमू लूकमध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. भुसावळ स्थानकावरून पहाटे 6.30 वाजता ही गाडी प्रस्थान करून 11.25 वाजता बडनेराला पोहोचेल. तर गाडी क्रमांक (61102-अप) बडनेरा-भुसावळ ही गाडी 3 फेब्रुवारीपासून नव्या लूकमध्ये धावेल. बडनेरा स्थानकावरून दुपारी 1.30 वाजता ही गाडी बडनेरा स्थानकावरून सुटेल.

यापूर्वी ही गाडी थेट नरखेड स्थानकावर जात होती. मात्र या क्रमांकाची ही गाडी नरखेड न जाता बडनेरापर्यंतच चालेल. बडनेरानंतरही हीच ट्रेन राहील. मात्र या गाडीचा क्रमांक दुसरा राहील. त्यामुळे प्रवाशांना गाडी बदलावी लागणार नाही. गाडी क्रमांक (61103) बडनेरा - नरखेड ही गाडी 12.15 वाजता नरखेडसाठी प्रस्थान करेल. तर नरखेड ते बडनेरासाठी (61106) हा गाडी क्रमांक राहील. सकाळी 9.15 वाजता नरखेड स्थानकावरून प्रस्थान करून दुपारी 1.10 वाजता ही गाडी बडनेराला पोहोचेल. यानंतर हीच ट्रेन गाडी क्रमांक (61102) क्रमांकासहित भुसावळला रवाना होईल. या गाडीला 8 मेमू कोच राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: कसोटीबाबत तळमळ; पण... टी-२० स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवचे पारंपरिक क्रिकेटबाबत मत

Shri Guru Paduka Darshan Mahotsav : श्रीगुरू पादुका दर्शन महोत्सवाची उत्कंठा,स्वामी स्वरूपानंदांच्या हस्ते शनिवारी उद्‍घाटन, गुरू श्री एम यांचे रविवारी व्याख्यान

Latest Marathi News Live Update : माहिममधील सेंट झेवियर्स कॉलेज बॉम्बने उडवून देण्याची धमकी

नाटक सुरु असताना अस्ताद काळे प्रेक्षकावर का भडकला? नाटक मध्येच थांबवून चांगलंच सुनावलं

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

SCROLL FOR NEXT