Bahiram Babas Yatra stopped due to Corona 
विदर्भ

शेकडो वर्षांची परंपरा खंडित; बहिरमबाबाची विधिवत पूजा, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यात्रा बंद

स्वप्नील वासनकर

करजगाव (जि. अमरावती) : शेकडो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र बहिरम येथील दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. दरवर्षी २० डिसेंबरला याठिकाणी पूजाअर्चा करण्यात येते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यात्रा बंद असल्याने याठिकाणी मोजक्‍या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने हा सोहळा पार पडला. 

बहिरमबाबाच्या मूर्तीला शेंदूर, दूध, दही, सहद व लोण्याचा अभिषेक करण्यात आला. विधिवत पूजेनंतर मंदिरासमोरील यज्ञात पूर्णाहूती देण्यात आली. होमहवनानंतर आरती करून रोडग्याचा नैवद्य बहिरमबाबाला दाखवण्यात आला. दरवर्षी या यात्रेला हजारो भाविक दर्शनाला येतात. विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ही यात्रा परिचित असल्याने भक्तमंडळी सलग दीड महिना याठिकाणी बहिरमबाबाच्या दर्शनाला येतात.

परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ही यात्रा बंद असल्याने भक्तांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. रविवारी (ता. 20) बहिरम बुवाच्या महापूजेला सुरुवात झाली. शिवमंदिर, हनुमान मंदिर, महागणपती मंदिर याठिकाणी अभिषेक करण्यात आला. सामाजिक अंतर राखून कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करून याठिकाणी पूजा झाली. 


सामूहिक जेवण व स्वयंपाकाला बंदी
बहिरम यात्रा व आजूबाजूच्या परिसरात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. सर्वप्रकारच्या स्वयंपाकाला व सामूहिक कार्यक्रमांना याठिकाणी बंदी आहे. कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल.  
- सचिन परदेशी,
प्रभारी ठाणेदार, शिरजगावकसबा

मंदिरात फक्त दुरूनच मुखदर्शन
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यात्रा यावर्षी बंद आहे. परंतु मंदिरात फक्त दुरूनच मुखदर्शन घेता येते. भक्तांनी सर्व नियमांचे पालन करून मुखदर्शन घ्यावे व प्रशासनाला आणि मंदिर समितीला सहकार्य करावे. 
- सुरेंद्र चौधरी,
अध्यक्ष, बहिरम बाबा संस्थान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT