St bus 
विदर्भ

सावधान! एसटीमध्ये चोरट्यांची टोळी सक्रिय; प्रवासी दाम्पत्यास बसला २ लाखांचा फटका

संतोष ताकपिरे

अमरावती ः जिल्ह्यात दोन महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सामानांची तसेच दागिन्यांची चोरी करण्यात येत आहे. अशाच प्रकारे एका दाम्पत्याच्या बॅगमधील दागिन्यांच्या दोन डब्या चोरीस गेल्या. त्या डब्यांमध्ये ८५ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोकड होती. कुणीतरी गर्दीचा फायदा घेऊन त्या डब्या सामानातून लंपास केल्या.

विठ्ठल श्‍यामराव दुधवडे (वय ६८) हे सेलू (जि. वर्धा) येथे राहणारे गृहस्थ पत्नीसोबत मुलांची भेट घेण्यासाठी सेलूवरून अमरावतीला येण्यासाठी एसटी बसने निघाले होते. प्रवासात त्याच्यासोबत असलेल्या एका बॅगेत आवश्‍यक सामानांसह तुरीच्या शेंगा, दागिन्यांच्या दोन डब्या व रोख रक्कम होती. सायंकाळी पत्नीसह दुधवडे अमरावतीच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात उतरले. तेथून ऑटोरिक्षाने शहरातील विश्‍वप्रभा नगरात मुलाच्या घरी उतरले. 

मुलाच्या घरी दुधवडे यांच्या पत्नीने तुरीच्या शेंगा काढण्यास बॅग उघडली असता त्यातील दागिन्यांच्या दोन डब्या, ज्यामध्ये ३० ग्रॅमचा पोहेहार, १५ ग्रॅमचा गोफ, २५ ग्रॅमचे मंगळसूत्र, १० व ५ ग्रॅमच्या दोन अंगठ्या, असे २ लाख १२ हजारांचे सोन्याचे दागिने व २ हजारांची रोख रक्कम, असा २ लाख १४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. दुधवडे यांच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

संपादनः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: ‘आधी सुरक्षित महामार्ग द्या, मगच टोल घ्या!’; कोकणवासीयांचा खारपाडा टोलनाक्यावर एल्गार, मुंबई-गोवा महामार्गावरील कामांवर संताप..

RCB vs GT, Qualifier 1 सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? सामना रद्द झाला, तर कोण गाठणार फायनल? वाचा नियम

आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात 'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू; अभिनेत्याने शेअर केली पोस्ट

Latest Marathi News Live Update : जनगणना परिषद आयोजनाच्या पार्श्वभूमीवर सावता परिषदकडून नियोजन बैठकीचे आयोजन

Farmers Gold Loan : खरिपाच्या भांडवलासाठी शेतकऱ्यांवर घरातील सोनं तारण ठेवण्याची वेळ; बँकांच्या कारभाराने भ्रमनिरास, कांद्यालाही मिळेना भाव!

SCROLL FOR NEXT