file photo 
विदर्भ

सावधान! आजपासून या तीन शहरांत लॉकडाउन...नागरिकांनी राखावे सामाजिक अंतर

श्रीकांत पेशट्टीवार

चंद्रपूर : जिल्ह्यातील घुग्घुस, गोंडपिंपरी व बल्लारपूर या तीन शहरांमध्ये सोमवार (ता. १७)पासून लॉकडाउन करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ७० बाधित पुढे आले आहे. सध्या जिल्ह्यात ३९० बाधितावर उपचार सुरू आहेत. ६७० बाधितांना आतापर्यंत सुटी मिळाली आहे. बल्लारपूर येथील एका वृद्ध महिलेचे निधन झाले आहे. जिल्ह्यात आतपर्यंत आठ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

घुग्घुस ग्रामपंचायतमध्ये १६ ऑगस्टपासून रात्री आठ वाजल्यापासून २० ऑगस्टपर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत सर्व किराणा दुकान, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते व इतर व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने, आस्थापना संपूर्णपणे बंद राहतील.

बल्लारपूर शहरातील रुग्णसंख्या शंभरावर पोहोचली आहे. त्यामुळे सोमवार १७ ऑगस्ट पहाटेपासून २१ तारखेपर्यंत बल्लारपूर-बामणी बंद राहणार आहे. गोंडपिंपरी शहरात कोरोनाने शिरकाव केला आहे.


गोंडपिंपरीत २२ पर्यंत लॉकडाउन

१६ ऑगस्टपासून २२ तारखेपर्यंत येथे लॉकडाउन पाळण्यात येणार आहे. गोंडपिंपरी शहरात २१ व २२ तारखेला फक्त जीवनावश्‍यक सेवा देण्यासाठी नऊ ते दुपारी दोन या कालावधीत दुकाने सुरू असतील. १४ ऑगस्ट रोजी सर्वाधिक बाधित हे बल्लारपूर शहरात आढळून आले.

नागरिकांनी काळजी घ्यावी

या शहरातील आतापर्यंत बाधिताची संख्या शंभरावर गेली. जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या १० नागरिकांपैकी ८ बाधित जिल्ह्यातील आहेत. दरम्यान, नागरिकांनी कोरोना संसर्ग होणार नाही, यासाठी अधिक काळजी घेण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लष्करच्या कुख्यात दहशतवाद्याला अटक, ISI च्या इशाऱ्यावर भारताविरोधात रचला होता मोठा कट

Maharashtra Weather: राज्याला उष्णतेच्या लाटेचा तडाखा, मुंबईकर हैराण; उष्माघाताच्या घटनांतही वाढ

बाबो! मार्केटमध्ये खरंच 'प्रोटीन कंडोम' आलंय? नक्की हे आहे तरी काय? Flying Beast खरंच सीरियस की घेतोय मजा, Viral

Latest Marathi News Live Update : अमरावतीत गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची तुफान गर्दी; ब्लॅक मार्केटचा गंभीर आरोप

Crime News : येळावी फाट्यावर तरुणाकडून २ गावठी पिस्तुले जप्त; मेढा येथील संशयितास अटक, २ काडतुसे हस्तगत

SCROLL FOR NEXT