Beaten love 
विदर्भ

प्रियकराला मारहाण करून मुलीला घेऊन भुर्रर्र...वाचा ही प्रेमकहाणी

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : प्रेमविवाह तिच्या पालकांना पसंत नव्हता. परंतु, ती तिच्या निर्णयावर ठाम होती. दोघांनी पळून जाऊन परत आल्यानंतर प्रेमविवाह केला. मात्र, एकवीस दिवसांच्या संसारानंतर तिच्या माहेरच्यांनी प्रियकराचे घर गाठून त्याला मारहाण केली. त्यानंतर मुलीला घेऊन ते भुर्रर्र झाले. 

पळून जाऊन केला नोंदणी विवाह

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्‍याच्या लोणी गावातील एका युवकाचे काही वर्षांपासून दुसऱ्या गावातील युवतीवर प्रेम होते. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु युवतीच्या कुटुंबीयांना त्यांचा आंतरजातीय विवाह पसंत नव्हता. त्यामुळे दोघेही काही दिवसांपूर्वी आपआपल्या गावांतून पळून नागपूरला गेले. तेथे तीन दिवस राहिल्यानंतर पुन्हा 16 जानेवारी रोजी अमरावतीला आले. तेथे त्यांनी नोंदणी विवाह केला. त्यानंतर कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून थेट बडनेरा पोलिस ठाणे गाठले. 

मुलीच्या नातेवाईकांची युवकाला मारहाण

बडनेरा पोलिसांनी दोघांच्याही नातेवाइकांना ठाण्यात बोलावून समेट घडविण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलीच्या नातेवाईकांना हा आंतरजातीय विवाह मान्य नव्हता. त्यामुळे समेट घडला नाही. तिला नातेवाईकांनी घरी नेण्यासाठी दबाव टाकला. परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. मुलगी आई-वडिलांकडे जायला तयार नव्हती. अखेर ठाण्यातूनच ती प्रियकराच्या अर्थात पतीच्या घरी गेली. त्यामुळे युवतीचा पिता आपल्या निवडक नातेवाइकांना घेऊन युवकाच्या गावात पोहोचला. त्यांनी मुलीच्या प्रियकरासोबत वाद घातला. त्याला बेदम मारहाणसुद्धा केली. एवढ्यावर त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी मुलीला बळजबरीने वाहनात बसविले व आपल्यासोबत घेऊन गेले. 

युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

युवकाच्या वडिलांनी मुलाची समजूत काढून दुसऱ्या गावातील नातेवाइकाकडे नेले. परंतु तेथेही त्याचे मन प्रेयसीलाच शोधत होते. पत्नी व वडिलांसमोर तिच्या माहेरच्यांनी आपल्याला मारहाण केली, याचा त्याच्या मनावर परिणाम झाला. त्यामुळे त्या युवकाने शनिवारी (ता. आठ) विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्था'वर...गणरायाचं घेतलं दर्शन, दोन महिन्यांतली तिसरी भेट

Manoj Jarange Patil: "गणेशोत्सवात अडथळा नाही, पण.." मुंबई कडे निघताना मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे घेतले गणेश दर्शन

Gold Rate Today : गौरी-गणपतीमध्ये सोने खरेदीचा विचार करत आहात? जाणून घ्या आजचा ताजा भाव

Latest Maharashtra News Updates : मनोज जरांगे पाटील यांचे पैठण मार्गे मुंबईकडे भव्य स्वागतासह प्रस्थान

Ganesh Festival 2025 : आणि रजिया मंजिल मध्ये गणपती आला....

SCROLL FOR NEXT