beating a junior engineer who went to cut the electricity connection in lakhani of bhandara 
विदर्भ

कनेक्‍शन कापण्यास गेलेल्या कनिष्ठ अभियंत्यास मारहाण, गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

लाखनी (जि. भंडारा) : तालुक्‍यात सध्या वीजबिल न भरणाऱ्यांचे कनेक्‍शन कापण्याची मोहीम सुरू आहे. त्यामुळे ग्राहक अडचणीत येत आहेत. रेंगेपार कोहळी येथील सुनील बोरकर यांनी मागील एक वर्षापासून विजेचे बिल न भरल्यामुळे आज कनिष्ठ अभियंता मुकूल श्रीराम शेंडे व कर्मचारी कनेक्‍शन कापण्यास गेले असता त्यांना मारहाण झाल्याची घटना घडली. याबाबत लाखनी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. 

१५ दिवसाचे आत ग्राहकांनी थकीत बिलाची भरणा केला नाही तर, त्यांचे वीज कनेक्‍शन खंडित करण्यात यावे, असे आदेश कंपनीकडून प्राप्त केले आहे. थकीत वीजबिलाचा भरणा न केल्यामुळे वरिष्ठ तंत्रज्ञान राजेश पुरुषोत्तम मते यांना खांबावर चढून कनेक्‍शन कापण्यास सांगितले. मते हे खांबावर चढत असताना सुनील लक्ष्मण बोरकर (वय ४५) घरातून हातात काठी घेऊन आला. तेव्हा कनिष्ठ अभियंता शेंडे यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला व शेंडे यांना मारहाण केली, यासंबंधात कनिष्ठ अभियंता शेंडे यांनी पोलिसत तक्रार दिली आहे. पोलिसांनी सुनील बोरकर याला अटक केली असन घटनेचा तपास पोलिस निरीक्षक मनोज वाढिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक युवराज म्हैसकर करीत आहेत. 

आम्ही थकित बिलाचे हप्ते पाडून द्यायला तयार आहोत. परंतु, ग्राहकांना वीज बिल भरायचेच नाही. त्यामुळे कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे जनतेने सहकार्य करावे. 
- राजन लिमजे, उपकार्यकारी अभियंता, लाखनी. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : गोदावरी कालवे 45 दिवस सुरू राहिल्याने जमिनी झाल्या नापिकी

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT