buldana.jpg 
विदर्भ

घराकडे पायदळ परतणाऱ्या परप्रांतीयांसोबत घडली माणुसकीला काळिमा फासणारी घटना...वाचा

सकाळ वृत्तसेवा

सिंदखेडराजा (जि.बुलडाणा) : एकीकडे कोरोना लॉकडाऊन दरम्यान पायदळी चालत स्वगृही परतणाऱ्यांच्या खाण्यापिण्याची सोय करण्यासाठी अनेक जण पुढे येत असतानाच या प्रवाशांची लूटमार करण्याच्या हेतूने मारहाण करण्याचा प्रयत्न होत असल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना (ता.24) दुपारी समोर आली आहे.

येथून जाणारे सत्यकुमार (वय 48), संजयकुमार (वय 31), जितेंद्रकुमार (वय 23), राजेशकुमार (वय 28), संदीपकुमार (वय 30) व त्रिलोककुमार (वय 34) हे मूळचे पहाडपुर चंदौली, उत्तरप्रदेश मधील सहा कामगार जालना एमआयडीसी मध्ये एका कंपनीत कामाला होते. लॉकडाऊनमध्ये वाढ होत गेल्यामुळे, तसेच इतर कुठलेही काम मिळत नसल्याने उपासमार होण्याच्या भीतीने हे सहा ही जण उत्तरप्रदेशात गावी परतण्यासाठी जालना येथून पायदळी निघाले होते. 

वाटेने मार्गक्रमण करीत असताना (ता. 24) दुपारी ते सिंदखेड राजा ते सावखेड तेजन दरम्यानच्या रस्त्याच्या कडेला काळेपाणी भागातील एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले होते. त्यावेळी पल्सर दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधलेले तिघेजण त्या ठिकाणी आले. त्यांनी या सहाही जणांना चाकूचा धाक दाखवीत मोबाईल व जवळ असलेली रक्कम देण्यासाठी दरडावले. मात्र, सहाही युवक प्रतिसाद देत नसल्याने त्यांच्यावर चाकू व दगडांनी हल्ला केला. यामध्ये सत्यकुमार व जितेंद्रकुमार हे जखमी झाले. 

मात्र, त्यानंतर या सहाही जणांनी प्रतिकार करण्यास सुरुवात केल्यावर तिघेही भामटे तेथून पल्सरवरुन फरार झाले. आपण प्रथमोपचार केले असून आपल्याला गावी जाणे महत्त्वाचे असल्याने तक्रार करणार नसल्याचे या युवकांनी सांगितले. या घटनेमुळे तालुकाभरात चर्चेला उधाण आले असून, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या त्या भामट्यांचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांना अद्दल घडविण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT