crime 
विदर्भ

अमरावतीत प्रेमप्रकरणातून युवकाच्या खुनाचा प्रयत्न 

संतोष ताकपिरे

अमरावती ः शहरातील यशोदानगर ते मोतीनगर मार्गावर एका उपहारगृहासमोर युवकावर प्राणघातक हल्ला करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न झाला. गुरुवारी (ता. पाच) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. 

यश नरेंद्र बल्लाळ (वय २५, रा. भाजीबाजार) असे हल्ल्यातील गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. योगेश घोडेस्वार याच्यासह त्याच्या अन्य एका सहकाऱ्याने हा हल्ला केल्याची बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आली. एका प्रेमप्रकरणाच्या वादातून ही घटना घडल्याचे पोलिस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी सांगितले. मोतीनगर मार्गावरील प्रज्वल उपहारगृहासमोर ही घटना घडली. 

काही दिवसांपासून यश व योगेश घोडेस्वार या दोघांमध्ये धुसफूस सुरू होती. योगेश व त्याचा साथीदार यशला भेटण्यासाठी आधी एलआयसी ऑफीसजवळ गेला. तेथे त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. काहींनी हटकल्यामुळे यशसह योगेश व त्याचा साथीदार हे त्यानंतर छत्रीतलाव परिसरात गेले. येथे पुन्हा त्यांच्यात चर्चा आणि वाद सुरू झाला. त्यानंतर यशला घेऊन ते दोघे मोतीनगर मार्गावरील उपहारगृहाजवळ आले. वादानंतर समेट न घडल्यामुळे पुन्हा शाब्दिक चकमक उडाली. योगेश व त्याच्या साथीदाराने यश बल्लाळ याला जबर मारहाण केली. चाकूने यशवर पाच ते सहा वार करून हल्लेखोरांनी पळ काढला. 

पोलिसांनी गंभीर जखमी यशला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी यशला खासगी रुग्णालयात हलविले. जखमीच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी घोडेस्वारसह साथीदाराविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प नरमले पण इराण युद्ध थांबवणार नाही, सांगितले 'हे' मोठे कारण

Satara Bribery Case: गुण नियंत्रण अधिकारी लाच घेताना ताब्‍यात; सातारा तालुक्यात खळबळ, खत तपासणीसाठी ५० हजारांची लाच, सापळा रचला अन्..

मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना बंद! 2 वर्षे झाले अर्ज करून सोलापुरातील 600 ज्येष्ठ नागरिकांना मिळेना ‘तीर्थदर्शन’; शेवटची इच्छा अपूर्णच, वाचा...

मोठी बातमी! आता प्रत्येक शिक्षकाचे स्वतंत्र प्रोफाईल तयार होणार; माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय; एका क्लिकवर मिळणार ३ लाख शिक्षकांचा बायोडाटा

Panchang 24 March 2026: आजच्या दिवशी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT