beds are not available in Rural hospital of of Salekasa Gondia  
विदर्भ

सालेकसातील ग्रामीण रुग्णालयात समोर आला धक्कादायक प्रकार; खाटांअभावी रुग्णांवर उघड्यावर उपचार

यशवंत शेंडे

सालेकसा (जि. गोंदिया) ः नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयांत खाटांचा अभाव असल्याने रुग्णांवर उघड्यावर उपचार केले जात आहेत. वेळेत औषधोपचार होत नसल्याची ओरडदेखील रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाइकांनी केली आहे. हा प्रकार थांबवावा, अशी मागणी होत आहे.
 
सालेकसा तालुका हा नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल आहे. सालेकसा येथे ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यात आले असून, हे रुग्णालय 30 खाटांचे आहे. सरकारी रुग्णालय असल्याने गोरगरिबांना आशेचे किरण वाटू लागले. मात्र, प्रत्यक्षात या रुग्णालयाची अवस्था फार बिकट आहे. रुग्णांची हेळसांड होत आहे.

विशेष म्हणजे, कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना पैसे मोजावे लागत आहेत. दवाखान्याच्या अवतीभोवती घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रुग्णांना रात्री खाली उघड्यावर रात्र काढावी लागत आहे. शिवाय रुग्णांना वेळेवर उपचार दिले जात नाही. रुग्णांना शौचालय, स्नानगृह, पट्टी बंधन या खोलीमध्ये रात्र काढावी लागते. 

सरकार नक्षलग्रस्त भागांत निधीची कमतरता भासू देणार नाही, असा ढिंढोरा पिटतो. या भागात आरोग्याच्या सुविधाही उत्तम असतील, असेही सांगतो. मात्र, सालेकसा येथील चित्र काही वेगळेच आहे. आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचेही रुग्णांवर औषधोपचाराकरिता दुर्लक्ष होत आहे. आरोग्य सेविकांचाही हेकेखोरपणा कायम आहे. त्यामुळे रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 

थंडीच्या दिवसांत रुग्णांना रात्र खाली उघड्यावर काढावी लागत असल्याने या रुग्णालयाची कार्यप्रणाली कशी असावी, याचा अंदाज येतो. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन येथील व्यवस्थेत बदल करावा, अशी मागणी होत आहे.          

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: कामासाठी इमारतीमध्ये गेले; पण कुत्रा मागे लागला अन्...; सारंच संपलं! पुण्यात 'त्या' इलेक्ट्रिशियनसोबत काय घडलं?

Ahilyanagar : एबी फॉर्म मिळवून अर्ज भरला, पक्षानं काढून टाकलं, चोरीचा ठपका ठेवत शिस्तभंगाची कारवाई

Stock Market Today : आज भारतीय शेअर बाजार विक्रमी पातळीच्या जवळ बंद; सेन्सेक्स तब्बल 446 अंकांनी वाढला; हे शेअर्स फायद्यात!

Latest Marathi News Update LIVE : अनिल देशमुखांच्या मुलाचा शरद पवार गटाला रामराम

Pune Municipal Election : पुण्यात ३५ लाख ५१ हजार मतदार! १० प्रभागातील मतदार संख्या लाखाच्या पुढे, प्रचारात उमेदवारांची होणार दमछाक

SCROLL FOR NEXT