Betrayed the beloved 
विदर्भ

प्रेम झाले, भेटीगाठी वाढल्या, आणाभाकाही घेतल्या, परंतु दुसरी भेटली आणि...

सकाळवृत्तसेवा

अमरावती : गावातील महिलेसोबत त्याचे सूत जुळले. जवळीक निर्माण झाली. परंतु त्याने लग्न दुसरीसोबत केले. त्यामुळे दुखावलेल्या प्रेयसीने पोलिसांत धाव घेतली. प्रेयसीला दगा देणाऱ्या या प्रियकराविरुद्ध धारणी ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. अमोल मेंदकर (वय 32) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.

त्याचे झाले असे की, अमोलचे काही वर्षांपासून महिलेसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. दररोज भेटणे, सोबत फिरणे, मोबाईलवन तासन्‌तास बोलणे सुरू असायचे. दिवसेंदिवस प्रेम फुलत गेले. अमोलने प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने तक्रारीतून केला. परंतु, ज्यावेळी प्रत्यक्ष लग्न करण्याची प्रत्यक्षात वेळ आली, तेव्हा अमोलने प्रेयसीला डावलून दुसरीसोबतच बोहल्यावर चढला.

लग्नाच्या आणाभाका घेतल्या, खाणे, फिरणे सोबत केले. आणि लग्नाची वेळ आली तेव्हा त्याने आपल्याला नाकारले, या विचाराने प्रेयसीच्या संताप अनावर झाला. आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक छळ करणारा प्रियकर दुसरीसोबत विवाहबंधनात अडकल्याचे कळताच त्याने आपणास दगा दिला, असा आरोप पीडित प्रेयसीने धारणी ठाण्यात दाखल तक्रारीतून केला. याप्रकरणी मंगळवारी (ता. 16) मेंदकरविरुद्ध गुन्हा दाखल झाला. बुधवारपर्यंत त्याला अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

अशीच एक बातमी :

'आय लाईक यू' पडले महाग
शिकवणीसाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीस थांबवून निखिल वानखडे याने जवळीक साधण्याच्या बहाण्याने तिच्यासोबत सेल्फी काढली. 'आय लाईक यू' म्हणून सहमती मिळविण्याचा प्रयत्न केला. ते निखिलला महागात पडले. त्याच्याविरुद्ध दत्तापूर ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईतील हरित ऊर्जेच्या पुरवठ्यात वाढ, टाटा पॉवरचा तीन कंपन्यांसोबत करार

UP Government : ​योगी सरकारची मोठी ॲक्शन; समाज कल्याण विभागाचे ४ अधिकारी बडतर्फ, ३ निवृत्त अधिकाऱ्यांच्या पेन्शन कपातीचे आदेश

मूळ ओबीसींनाच तिकीट, भाजपसोबत जायचं नाही; स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत शरद पवारांनी दिल्या सूचना

School Bus Accident: नंदुरबारमध्ये भीषण अपघात! स्कूल बस दीडशे फूट खोल दरीत कोसळली; १ विद्यार्थ्याचा मृत्यू, अनेक जखमी

सॅनिटरी पॅडमध्ये लपलेलं 'हे' काय आहे? "तुमचं पॅड खरंच स्वच्छ आहे का?" उजेडात दिसलं धक्कादायक सत्य... जगभरात Viral Video

SCROLL FOR NEXT