Corona esakal
विदर्भ

दोन महिन्यानंतर विदर्भातील 'या' जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

भाग्यश्री राऊत

नागपूर : गेल्या दोन महिन्यानंतर भंडारा (bhandara) जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये (second wave of corona) एकही मृत्यू न होणारा भंडारा हा विदर्भातील पहिला जिल्हा ठरला आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये दुसऱ्या लाटेमध्ये जवळपास ७०० मृत्यू झाले असून आता ग्राफ अचानक खाली घसरला आहे. (bhandara district have no death on friday after two months)

जिल्ह्यात शुक्रवारी १४२१ जणांच्या कोरोना चाचणी केल्यानंतर फक्त ८४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून कोरोनामुक्तीकडे जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मृत्यूदर देखील कमी झाला आहे.

विदर्भातील शुक्रवारी ५८ हजार ७८९ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र, त्यापैकी फक्त ५१५४ जण पॉझिटिव्ह आढळून आले. यावरून सलग दुसऱ्या दिवशीही पॉझिटिव्हिटी दर हा १० टक्क्यांच्या खाली आल्याचे दिसून येत आहे. जवळपास ८७९८ रुग्ण बरे झाले असून ही आकडेवारी पॉझिटिव्ह लोकांपेक्षा जास्त आहे. विदर्भात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर हा ९२ टक्क्यांवर पोहोचला असून हा दर राज्य आणि राष्ट्रीय सरासरीपेक्षा चांगला आहे. शुक्रवारी १३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यापैकी जास्तीत जास्त रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत.

जिल्हा पॉझिटिव्ह मृत

नागपूर १००० ३३

  • वर्धा ३९५ १५

  • भंडारा ८४ ०

  • गोंदिया १३० ४

  • चंद्रपूर ५२० १४

  • गडचिरोली २३७ १३

  • अमरावती ८९३ १७

  • यवतमाळ ३५५ ७

  • अकोला ५०३ १७

  • वाशीम ३८२ ९

  • बुलढाणा ६५५ ५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: कर्जतमध्ये हालीवली येथे पैशाचा पाऊससाठी अघोरी विद्या

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT