bhandara farmer
bhandara farmer 
विदर्भ

Video : या बळीराजाने पिकांवर नाही तर स्वतःच्या स्वप्नांवर चालवली कुऱ्हाड

अभिजित घोरमारे

भंडारा : कोरोनामुळे सुरू असलेल्या संचारबंदीचा फटका आता शेतकऱ्यांनाही बसत असून दर मिळत नसल्याने भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील टमाटे आणि वांग्याचे जवळपास 4 लाखांचे संपूर्ण पीक उपटून टाकले. बाजारात 50 पैसे किलो प्रमाणेही कोणी व्यापारी खरेदी करीत नाही त्यामुळे नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला, अशी प्रतिक्रिया या शेतकऱ्याने दिली आहे.

मोहाडी तालुक्यातील खरबी या गावात दिनेश देशमुख यांची दहा एकर शेती आहे.  या शेतीमध्ये डिसेंबर महिन्यात दोन एकरावर त्यांनी वांगे आणि टमाटरची लागवड केली होती. सुरुवातीचे तीन तोडे केल्यावर त्यांच्या मालाला चांगला दर मिळाला. या मधून त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले. मात्र संचारबंदी सुरू होताच शेत मालाला बाजारपेठेतून मागणी कमी झाली, त्यामुळे व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात माल खरेदी करणे बंद केले. त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावर  झाला असून ठोक बाजारात वांग्याला 50 पैसे प्रतिकिलो दर मिळणे कठीण झाले आहे.

दिनेश देशमुख यांनी रविवारी बाजारात विक्रीसाठी नेलेली वांग्याची 15 पोती, विक्री न झाल्याने फेकून द्यावी लागली. तसेच मजुरांच्या तोडणीचा आणि बाजारपेठेत नेण्यासाठी लागणारा वाहतुकीचा अतिरिक्त खर्चही देशमुख यांना करावा लागला. एक तर माल फेकावा लागला व इतर खर्च ही करावा लागला त्यामुळे पुढे काय करावे या विवंचनेत असलेल्या या शेतकऱ्यांनी हृदयावर दगड ठेवत एक मोठा निर्णय घेतला. काही मजूर घेऊन  हाता तोंडाशी आलेले पीक पूर्णपणे उपटून आणि तोडून टाकले. ही संचारबंदी नसती तर देशमुख यांना पुढच्या दोन ते तीन महिन्यात अंदाजे 3 ते 4 लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते. या सर्व उत्पन्नाला देशमुख यांना मुकावे लागले आहे.

शेतकऱ्यांना जगणे कठीण होईल
सरकारने नुकसान भरपाई द्यावी संचारबंदीचा फटका आम्हा शेतकऱ्यांना बसत असून शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आमच्या होणाऱ्या नुकसानाचे सर्वेक्षण करून काही मदत मिळाल्यास शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. अन्यथा शेतकऱ्यांना जगणे कठीण होईल.
- दिनेश देशमुख,  शेतकरी, खरबी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूड इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

SCROLL FOR NEXT