Crime News  sakal
विदर्भ

Crime News : शेतीसाठी पुतण्याने केला वृद्ध काकूचा खून

शेतीच्या जुन्या वादातून पुतण्याने वृद्ध काकूचे नाक ,तोंड व गळा दाबून खून केला.

सकाळ वृत्तसेवा

पालांदूर - शेतीच्या जुन्या वादातून पुतण्याने वृद्ध काकूचे नाक ,तोंड व गळा दाबून खून केला. ही घटना एक ऑगस्ट रोजी सायंकाळी देवरी- किटाडी जंगल परिसरात डांबरी रस्त्याच्या बाजूला घडली.पण घटना पाच दिवसानंतर उघड झाल

देवलाबाई किसन गेडाम (वय ५५) रा. देवरी (गोंदी) असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपीचे नाव स्वप्नील अभिमान गेडाम (वय ३१) असे आहे.

किटाडी येथील देवलाबाई गेडाम रानभाज्या गोळा करण्याचे काम करायची. लग्नानंतर पतीचे निधन झाल्याने ती माहेरी देवरी /गोंदी येथे राहात होती. सासरच्या सामूहिक जमिनीवर वारस हक्काने सातबारावर तिचे नाव आहे. तिचा चुलत दिर अभिमान जयराम गेडाम यांच्यासोबत वाद होता.

देवलाबाईला अपत्य नसल्याने तिला जागेचा हक्क देऊ नये असे सासरच्या मत असल्याने हा वाद न्यायालयीन प्रक्रियेत सुरू आहे. घटनेच्या दिवशी जंगलात रानभाजी शोधताना देवलाबाई जंगलातील रस्त्यावर दिसली.

आरोपी स्वप्नील गेडाम याने तिच्यासोबत जुना शेतीचा वाद उकरून काढला. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. तेव्हा आरोपीने तिच्या गालावर दोन-तीन थापड व बुक्क्या मारून जमिनीवर पाडले.

त्यानंतर नाक, तोंड व गळा दाबून तिच्या खून केला.दुसऱ्या दिवशी २ ऑगस्टला देवरीच्या पोलिस पाटलांनी पालांदूर पोलिस ठाण्यात देवलाबाईचा मृतदेह आढळल्याची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather: पुणेकरांना उकाड्याचा तडाखा; कमाल ३७ अंश सेल्सिअस, पुढील तीन दिवस हवामान स्थिर राहणार

पतीचे निधन, २०व्या वर्षी संसाराचा गाडा हाती आला, रोज मुंबई-पुणे प्रवास; ३ मुलांसाठी झटणाऱ्या पॉईंट्समनची प्रेरणादायी कहाणी

Viral News: Google Mapsचा घात! लग्नाला निघालेले तरुण थेट नाल्यात; कार हवेत लटकली

India vs New Zealand T20 World Cup Final: टी-२० विश्वकरंडकाची अंतिम लढत; सूर्यकुमारच्या संघासमोर न्यूझीलंडचे आव्हान

Pune Crime News : पुण्यात महिला दिनीच धक्कादायक प्रकार, “तू खूप सुंदर दिसतेस” म्हणत डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग; आरोपी सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT