Bhandara police destroyed wine hotspots in Wash out  
विदर्भ

‘वॉश आउट’मध्ये चार दारूभट्ट्या उद्‌ध्वस्त; कारधा पोलिसांची कारवाई, सहा लाखांचा माल जप्त

दीपक फुलबांधे, सकाळवृत्तसेवा

भंडारा : अवैध धंद्यांना आळा बसावा यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस दलाकडून वॉश आउट मोहीम राबविण्यात येत आहे. यात कारधा पोलिसांनी वैनगंगा नदीच्या पात्रातील चार दारूभट्ट्या उद्‌ध्वस्त करून सुमारे सहा लाख रुपये किमतीचा माल जप्त केला आहे.

येथील जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव व अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांनी वॉश आउट मोहीम राबविण्याचा निर्णय बैठकीत घेतला. त्याबाबत कारवाई करण्यासाठी प्रशासनाकडून पोलिस दलाला बोट उपलब्ध करून दिल्या आहेत. कारधा येथील सहायक पोलिस निरीक्षक दीपक वानखेडे यांनी वैनगंगा नदीपात्रात बोटीतून पथक रवाना करून अवैध दारूभट्ट्यांवर छापे टाकले.

मकरधोकडा येथील श्‍यामराव जगनाडे याच्या भट्टीवर १० ड्रम, ५० मडके व १० प्लॅस्टिक ड्रममध्ये मोहफुलांचा सडवा, जळाऊ लाकडे असा एक लाख ४७ हजारांचा माल मिळाला.

आंबाडी येथील सुरेंद्र कळंबे याच्या भट्टीवर सहा लोखंडी ड्रम, ३५ मडके, २५ प्लॅस्टिकचे ड्रम भरून मोहापास व लाकडे असा एक लाख ४३ हजार रुपयांचा माल मिळाला. तिड्डी येथील रवी मेश्राम याच्या भट्टीवर आठ ड्रम, ३० मातीचे मडके व ५० प्लॅस्टिक पिशव्यांत मोहापास व लाकूड असा एक लाख ६३ हजारांचा माल मिळाला आहे. तसेच संगम पुनर्वसन येथील आकाश मेश्राम याच्या भट्टीवर सात लोखंडी ड्रम, १५ मातीचे मडके, २५ प्लॅस्टिकच्या पिशव्या, १५ प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये मोहफुलांचा सडवा आणि जळाऊ लाकूड असा एक लाख ४४ हजार ३७५ रुपयांचा माल मिळाला आहे.

मकरधोकडा परिसरात या भट्ट्या उद्‌ध्वस्त करण्यात आल्या असून, पोलिसांनी एकूण पाच लाख ९८ हजार २५० रुपयांचा माल जप्त केला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक दीपक वानखेडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा भव्य सोहळा! ध्वजारोहणापासून भाषणापर्यंत... १५ ऑगस्टला काय-काय घडणार? वाचा मिनिट-टू-मिनिट वेळापत्रक

Success Story: 1.5 लाखांची नोकरी सोडली; देशी कोंबड्यांच्या व्यवसायातून आता वर्षाला 36 लाखांचा नफा!

R. Ashwin: अश्विन क्रिकेटवर बोलत होता अन् अचानक घराबाहेर पोलीस आले; फोन उचलताच समोर आलं ‘ते’ कारण...

National Highway: महिनाभरातच पुलाला खड्डे, सात कोटींच्या कामावर प्रश्नचिन्ह; ठेकेदारावर कारवाईची मागणी

Nag Panchami 2026: भावासाठी उपवास,जमीन न खोदणे ते चुलीचा नियम; जाणून घ्या नागपंचमीला पाळल्या जाणाऱ्या प्रथा!

SCROLL FOR NEXT