Nana Patole Accident Esakal
विदर्भ

Nana Patole Accident : भंडाऱ्यात नाना पटोलेंचा गाडीला भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत गाडीचे मोठे नुकसान

Nana Patole Accident : प्रचार करून परतत असताना ट्रकने मागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये नाना पटोले हे थोडक्यात बचावले आहेत. यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

अंकिता खाणे (Ankita Khane)

भंडाऱ्यामधून मोठी घटना समोर आली आहे. भंडाऱ्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. प्रचार करून परतत असताना ट्रकने मागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये नाना पटोले हे थोडक्यात बचावले आहेत. यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ ही घटना घडली. काल (मंगळवारी) रात्रीच्या सुमारास प्रचारांनतर सुकळी या गावी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्याच्या गाडीला जोराची धडक दिली. या अपघातामध्ये गाडीचं मोठं नुकसान झालं आहे.

विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का ? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौ-यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का ? अशी शंका आहे. मायबाप जनतेच्या आशिर्वादाने नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत.

नाना पटोले हे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांचा प्रचार दौरा करून रात्रीच्या वेळी परतत असताना भिलेवाडा गावाजवळ त्यांच्या ताफ्याला भरधाव आणि अनियंत्रित ट्रकने मागून जोरदार धडक दिली. यामुळे हा भीषण अपघात झाला. नाना पटोले हे ज्या गाडीत बसले होते, त्या गाडीच्या मागचा भागाचा चुराडा झाला आहे. सुदैवानं या अपघातामध्ये नाना पटोले आणि गाडीतील इतर कोणालाही कोणतीही दुखापत झालेली नाही.

या अपघाताची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र चालकाचं ट्रकवरील नित्रंयण सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. भरधाव ट्रक ताफ्यात घुसून हा अपघात झाला आहे.

नाना पटोलेंच्या अपघातानंतर अतुल लोंढेंची सोशल मिडीयावर पोस्ट

नाना पटोलेंच्या अपघातानंतर अतुल लोंढेंनी सोशल मिडीयावर पोस्ट लिहली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौ-यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का? अशी शंका आहे.

मायबाप जनतेच्या आशिर्वादाने नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत, अशी पोस्ट त्यांनी एक्सवर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT