aag 
विदर्भ

गोठ्यात आगीचे तांडव! जनावरांचा चारा, खत व शेती अवजारे,लाखोंचा माल जळून खाक

सकाळ वृत्तसेवा

राजुरा (चंद्रपूर) : उन्हाळ्याच्या दिवसात आगी लागण्याचे प्रमाण खूप वाढते.
राजुरा तालुक्यापासून पंधरा किमी अंतरावर असलेल्या साखरी येथील देवराव नानाजी पोडे यांच्या गावाबाहेरील गोठ्याला मध्यरात्री १:३० वाजता शार्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत गोठा पूर्णपणे जळून खाक झाला असून यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
देवराव पोडे यांचा गावालगत निर्ली रस्त्यावर सिमेंट, विटा व टीनपत्र्याचा मोठा गोठा होता, त्यात शेतीउपयोगी अवजारे, जनावरांचा चारा व रमेश निमकर यांच्या मालकीच्या १५० युरिया खतांच्या बॅग व पाच प्लास्टिक ड्रम  ठेवलेले होते.  (दि. २९) मध्यरात्री सर्वत्र शांतता असताना व गाव गाढ झोपेत  असताना १:३० वाजताच्या दरम्यान गोठ्याजवळ शार्टसर्किटमुळे विस्तावाची ठिणगी पडली व आजूबाजूच्या कचऱ्याला आग लागली. या आगीने गोठ्याला विळख्यात घेतले. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले असता नजीक असलेल्या नागरिकांना आगीचे लोंढे व मोठा उजेड दिसू लागला, आजूबाजूला ओरडून आग लागल्याचे सांगितले असता परिसरातील नागरिकांनी गोठ्याकडे धाव घेत गोठ्याच्या बाहेर बांधलेली जनावरे मोकळी केली. आगीची वार्ता पोहोचताच  नागरिक गोठ्याकडे धावू लागले मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही. काही क्षणामध्येच आगीच्या विळख्यात रमेश निमकर यांची युरिया खताच्या १५० बॅग, पाच प्लास्टिक ड्रम, देवराव पोडे यांच्या जनावरांचा चारा, कडबा, कुटार, शेतीउपयोगी अवजार नांगर, वखर यासह गोठ्याच्या बांधकामात वापरलेले सागवान फाटे, टीनपात्रे सर्व जळून खाक झाले. देवराव पोडे व रमेश निमकर त्यांचे मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
 सविस्तर वाचा - ...आणि आयुक्त तुकाराम मुंढे पोचले जनतेत; केले हे आवाहन
तोंडावर शेतीचा हंगाम आला असून यात शेतीउपयोगी अवजार, जनावरांचा चारा व खतांचा केलेला साठा यांचे नुकसान झाल्याने पोडे व निमकर यांच्यासमोर मोठे संकट उभे झाले आहे. घटनेचा पंचनामा तलाठी आशा भोयर यांनी केला असून नुकसानीची भरपाई मिळण्याची मसगणी निमकर व पोडे कुटुंबीयांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025 Final: पाऊस असाच सुरू राहिला तर २०-२० षटकांची होईल फायनल! जाणून घ्या कधी व किती वाजता लागू होईल हा नियम...

Waluj MIDC Roads: वाळूज एमआयडीसीतील रस्‍ते गेले खड्ड्यांत; उद्योजक त्रस्त, एक वर्षात उखडला रस्ता

अंगात ताप अन चालताही येईना, बिग बॉस 19 मधून प्रणित मोरे बाहेर ! एव्हिक्शन होत नाही तोच कमबॅकच्या चर्चा

Satara Woman Doctor Case: फलटण डॉक्‍टर आत्‍महत्‍या प्रकरण! 'तेजस्‍वी सातपुतेंच्‍या देखरेखीखाली हाेणार तपास'; फलटणला येऊन घेतली माहिती

Ajanta Caves: अजिंठा लेणीतील भित्तिचित्रे पुन्हा चर्चेत; देशाच्या सागरी वारशाचा मोदींच्या भाषणात गौरवशाली उल्लेख

SCROLL FOR NEXT