gumgao 
विदर्भ

दुष्काळात तेरावा... आगीच्या भक्ष्यस्थानी पडला फाटका संसार

सकाळ वृत्तसेवा

गुमगाव (नागपूर) : कोरानाचे संकट डोक्‍यावर ठाण मांडून असताना आणि नागरिकांचे नोकरी-व्यवसाय ठप्प पडलेले असतानाच आगीच्या घटनाही अधूनमधून सत्व परीक्षा घेत आहेत. काही ध्यानीमनी नसताना गुमगाव येथील झोपडपट्टी परिसरात दोन घरांना अचानक आग लागली. आणि घरात होते नव्हते ते सगळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
सकाळची चूल पेटली तर संध्याकाळचे काय आणि रात्री पो टात दोन घास गेले तर उद्याचे काय? अशी स्थिती असलेल्या या नागरिकांचे सगळेच आगीत स्वाहा झाले आहे. आता खायचे काय आणि शिजवायचे तरी कशात? असा प्रश्‍न या मंडळींपुढे उभा राहिला आहे. या आगीमुळे दोन जणांचे संसार उघड्यावर आले आहेत. घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. ही घटना सोमवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सुरेश सहारे यांच्या घराला अचानक लागलेल्या आगीने लगतच्या चैतराम दूधकवर यांच्या घराला सुद्धा आगीने वेढा घातला. आगीने तात्काळ विक्राळ रूप घेतल्याने परिसरात आगीचे लोळ उठले होते. हा परिसर दाट लोकवस्तीचा असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी गावकऱ्यांच्या प्रयत्नाने आग नियंत्रणात आली. कोरोनाच्या संकटकाळात आगीमध्ये दोन्ही घरातील कित्येक संसारोपयोगी साहित्य,धान्य,कपडे,भांडी जळाल्याने सहारे आणि दुधकवर कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. दोन्ही कुटुंबीयांनी शासनाकडून ताबडतोब नुकसान भरपाईची मागणी केली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Without Fear or Favour Book Controversy : "विदाउट फ़ियर ऑर फ़ेवर" पुस्तकातील दाव्यांची जोरदार चर्चा; न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावरून नवा वाद!

सूर्याचा राहूच्या नक्षत्रात प्रवेश; वृषभसह ५ राशींना नोकरी अन व्यवसायात आर्थिक लाभ

IMD Weather Alert : चक्रीवादळाने रौद्ररूप धरले! ताशी १०० किमी वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा; 'या' राज्यांत मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात काय घडणार?

फ्लिपकार्टच्या गोदामातून ९८० सॅमसंग मोबाईल चोरीला; पुरावा मिळू नये म्हणून CCTV चा डीव्हीआरही पळवला...

Jamgaon News: रविवारी सुट्टी असतानाही सीईओंची जामगावला भेट; अपघातात मृत सेविकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन

SCROLL FOR NEXT