devendra fadanvis 
विदर्भ

Devendra Fadanvis: ओबीसी नेत्याला संपवण्यासाठी 25 पक्ष एकत्र; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

कार्तिक पुजारी

वाशिम- ओबीसींच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. ओबीसी लोकांसाठी भाषण करुन काहीही होत नाही. राहुल गांधींना आता कुठे ओबीसींची काळजी वाटू लागली आहे. पंतप्रधान मोदी ओबीसी नेते आहेत. ते ओबीसींच्या पाठिशी आहेत. पण, ओबीसी नेत्याला संपवण्यासाठीच २५ राजकीय पक्ष एकत्र आले आहेत, असा घणाघात देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. ओबीसी नेत्याला पंतप्रधान करणार का? असा सवाल त्यांनी काँग्रेसला केला. काँग्रेसने आतापर्यंत ओबीसींसाठी काहीही केलं नाही. इतक्या वर्षात ओबीसींची जनगणना का केली नाही? आताच त्यांना ओबीसींची का आठवण आली. फक्त एससी आणि एसटी समाजाचीच जनगणना होत होती, असं फडणवीस म्हणाले.

देशातील साठ टक्के मंत्री एससी आणि एसटी समाजातील आहेत. हे आतापर्यंत कधीच घडलं नव्हतं. काँग्रेस पक्षाने आतापर्यंत अडीचशे मुख्यमंत्री दिले त्यापैकी १७ टक्के ओबीसी होते. तर भाजपने दिलेल्या ६८ मुख्यमंत्र्यांपैकी ३१ टक्के ओबीसी आहेत. त्यामुळे कृतीतून सर्व काही दिसून येते. आमच्या पंतप्रधानांची आम्ही जात सांगत नाही. पण, एक ओबीसी पंतप्रधान झाल्याने त्यांच्या पोटात दुखत आहे, अशी टीका त्यांनी केली.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वात देश जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनणार आहे. अर्थव्यवस्था मोठी झाल्यास संधी अधिक निर्माण होतात. मोदींच्या नेतृत्त्वात मोठा विकास होत आहे. ओबीसींची जनगणना करायला आम्ही कधीच नाही म्हटलेलं नाही. पण, जातीजातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. असे जातीय भांडण निर्माण होईल असं आम्ही काही करणार नाही, असं प्रतिपादन फडणवीसांनी केले.

भारतीय जनता पक्ष हा नैसर्गिकरीत्या ओबीसी, भटक्या विमुक्त जातींचा आहे. भाजपचा डीएनए ओबीसी, भटक्या विमुक्त जातींचा आहे. ओबीसींसाठी सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात काम सुरु आहे. इतक्या वर्षात ओबीसींसाठी मंत्रालय तयार करण्यात आलं नव्हतं. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यादा ओबीसी आणि व्हीजेएनटीसाठी मंत्रालय तयार केले. आमच्या सरकारने ३० जीआर ओबीसी समाजासाठी काढले आहेत, असं ते म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Panvel Express : नांदेड-पनवेल, हडपसर रेल्वेला आता तीन डबे वाढणार; प्रत्येक फेरीत २०४ प्रवाशांची अतिरिक्त सोय

Iran Hormuz Crisis: होर्मुझसाठी इराणच्या सात अटी; पूर्तता होईपर्यंत वाटाघाटी नाहीच, लष्करी कारवाईचाही पर्याय

Missing Person Complaints : बेपत्ताच्या तक्रारींवर आता थेट अपहरणाचा गुन्हा नवा नियम पोलिसांसाठी डोकेदुखी : अल्पवयीन प्रकरणी चार महिन्यांची मुदत

Marathi News Live Updates : टिटवाळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत राडा; ७० ते ८० जणांविरोधात गुन्हा

Asian Games Shooting : आता विश्वकरंडकात पदक जिंकण्याचे ध्येय ; कोल्हापूरची मराठमाेळी नेमबाज सोनम मस्करचा विश्वास

SCROLL FOR NEXT