file photo 
विदर्भ

राजस्थानवरून यशोमती ठाकूर विरोधात भाजपने पेटविले शाब्दिक युद्ध 

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : शेणातला किडा संबोधले आहे. त्यावर पलटवार करीत भाजपनेही कॉंग्रेसमधील असंतुष्टच बाहेर पडत असल्याने यशोमती ठाकूर यांनी आपला पक्ष सांभाळावा, असा सल्ला दिला. 

तर गाठ माझ्याशी आहे... 
महाराष्ट्रातही कॉंग्रेसमध्ये लवकरच फूट पडणार असून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार आहे, असा प्रचार सोशल मिडियावरून सुरू झाला आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना यशोमती ठाकूर यांनी भाजपला शेणातला किडा असे संबोधून महाराष्ट्रात भाजप असे फोडाफाडीचे राजकारण करणार असेल तर गाठ माझ्याशी आहे, कॉंग्रेसशी आहे, असा इशारा त्यांनी दिला. त्या पुढे म्हणाल्या की, केंद्रात त्यांना सत्ता मिळाली असताना राज्यातील सत्तेची त्यांना हाव आहे. मात्र महाराष्ट्र सरकार स्थिर आहे. या सरकारने देशासमोर नवा फार्म्यूला ठेवला असून तो दीर्घकाळ टिकेल. कोणी अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास, पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही चांगलेच बदडू. आम्ही गांधीवादी आहेत, पण भाजपची दादागिरी किती दिवस सहन करायची? असा सवालही त्यांनी केला. 

कॉंग्रेसच नेतृत्वहीन 
यशोमती ठाकूर यांच्या या इशाऱ्याला भाजपच्या जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांनी उत्तर देत यशोमती ठाकूर यांचा इशारा सवंग प्रसिद्धीसाठी असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या, भाजप कॉंग्रेसचे आमदार फोडत नसून स्वतः कॉंग्रेसच नेतृत्वहीन झाल्याने व कॉंग्रेसमध्ये भविष्य दिसत नसल्याने विविध राज्यातील कॉंग्रेसचे आमदार भाजपत दाखल होत आहेत. महाराष्ट्रातही असे काही होऊ शकते, याची कदाचित चाहूल यशोमती ठाकूर यांना लागली असावी. सवंग प्रसिद्धी मिळविण्यासाठी अशा क्‍लूप्त्या अधून मधून लढविणे ही यशोमती ठाकूर यांची जुनीच सवय आहे. मंत्री राज्याच्या असताना त्या राज्यात फिरून लोकांचे प्रश्न सोडविण्या ऐवजी अमरावतीत बसून नसत्या उठाठेवी करीत आहेत. अशी टीका सुद्धा त्यांनी केली. या प्रतिक्रियांमुळे राजकीय क्षेत्रातील कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. 
 

—संपादन : चंद्रशेखर महाजन
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT