raktdan 
विदर्भ

खाकी वर्दीतले देवदूत...मुलीला दिले जीवदान

सकाळ वृत्तसेवा

भंडारा : काविळ झाल्याने अशक्त झालेल्या मुलीला डॉक्‍टरांनी रक्त चढविण्याचा सल्ला दिला. परंतु, मोलमजुरी करुन जगणाऱ्या तिच्या आईवडिलांजवळ रक्त विकत घेण्यासाठीही पैसे नव्हते. तिचे कुटुंब दारिद्रयरेषेखाली असूनही त्यांच्या जवळ बीपीएलचे कार्ड नाही. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीतूनही रक्त देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे रक्तांअभावी आपल्या मुलीचे कसे होणार या विवंचनेत असणाऱ्या मायबापांच्या लेकीसाठी तीन पोलिसांनी रक्तदान करुन आपल्या सह्वदयतेचा परिचय देत 13 वर्षीय मुलीला जीवनदान दिले. रक्ताच्या नात्यांपेक्षा माणुसकीचे नाते मोठे असते, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले.

पिंपळगाव (निपाणी) ता. पवनी येथील लखपती मेश्राम यांची मुलगी सलोनी(वय 13) ही आठव्या वर्गात शिकते. आई व वडिल दोघेही मोलमजुरी करुन चरितार्थ चालवितात. अशातच मुलगी सलोनी हिला कावीळ झाल्याने तिला भंडारा येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आला. आजारपणामुळे तिच्या शरीरातील रक्त कमी झाले, तिला रक्त चढवावे लागेल असे उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या दाम्पत्यांकडे बि.पी.एल. चे कार्ड नसल्यामुळे सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमधुन त्यांना रक्त मिळाले नाही. अनोळखी ठिकाणी वेळेवर कोणी ओळखीचा रक्तदाता देखील उपलब्ध नव्हता. सलोनीला कमीतकमी तीन रक्तपिशव्यांची आवश्‍यकता असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले होते. त्यामुळे एक पिवशी 850 रुपये प्रमाणे तीन पिशव्यांसाठी लागणारी रक्कमही त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे अत्यंत हवालदिल होऊन चिंताग्रस्त अवस्थेत शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढी बाहेर ते बसले होते. तिची आई मुलीच्या काळजीने चिंताग्रस्त होऊन धायमोकलुन रडत रक्तासाठी याचना करीत होती. परंतु तेथे असलेल्या कोणालाही पाझर फुटला नाही.

पोलिस आले मदतीला....
सकाळी साडेअकराच्या दरम्यान कारधा ठाण्यातील पोलिस शांताराम तिबुडे रक्तपेढी विभागप्रमुख डॉ. श्रीमती सोनवणे यांना शेषन समन्स तामील करण्यासाठी गेले होते. तेव्हा सलोनीची आई व वडील दोघेही रडत असल्याचे दिसले. त्यांनी चौकशी केली असता, मुलगी सलोनी हिला रक्ताची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची परिस्थिती पाहून शांताराम तिबुडे यांनी लागलीच रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले. रक्तदात्याचे कार्ड त्या दाम्पत्याला दिले. त्यानंतर लागलीच ही बाब कारधा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गजानन कंकाळे यांना सांगितली. त्यांनीसुद्धा तत्परता दाखवत पोलिस स्टेशन कारधा येथून पोलिस शिपाई कांतिश कराडे व विवेक रणदिवे यांना जिल्हा रुग्णालयात पाठविले. त्या दोघांनीही स्वेच्छेने रक्तदान करून ते कार्ड त्या दांपत्याला दिले. या तिघांच्या कार्डवरुन रक्तपेढीतून मिळालेले रक्त सलोनीला देण्यात आले. या प्रसंगामुळे सलोनीच्या आई-वडिलांचे डोळे पाणवले. त्यांनी गदगद होऊन पोलिस कर्मचाऱ्यांचे आभार मानले. पोलिस केवळ कर्तव्य कठोर नसतात, त्यांच्यातही माणुसकीचा ओलावा असतो, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : माता न् तू वैरिणी ! आईनेच एक महिन्याच्या चिमुकलीला तलावात बुडवले अन्...

Latest Marathi News Updates : उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी

Beed Crime: मद्यधुंद चालक-वाहकांनी दामटली बस; बीडजवळ प्रकार उघडकीस, प्रवाशांची घाबरगुंडी, गुन्हा नोंद

Paithan Pandharpur Road: पैठण-पंढरपूर पालखी मार्गाचे काम रखडले; अवमान याचिकेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला नोटीस

ULFA(I) claim Indian Army drone strike: ! भारतीय लष्कराने म्यानमार सीमेवर ड्रोन हल्ले केल्याचा दहशतवादी संघटना ULFA(I)चा दावा!

SCROLL FOR NEXT