elder man akola.jpg 
विदर्भ

रेल्वे पटरी जवळ आढळला ‘त्या’ वृद्धाचा मृतदेह अन् उडाली खळबळ

सकाळ वृत्तसेवा

अकोला : शहरातील वृंदावन नगर परिसरात असलेल्या रेल्वे पटरी जवळील 774/5 क्रमांकाच्या पोलजवळ 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना 6 मे रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरात तपासणी करून घटनास्थळाची पाहणी केली.

ही आत्महत्या आहे की, रेल्वे ट्रकने उडवले की, घातपात हे अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहे. याप्रकरणी अद्यापही पोलिसांना कुठलाही सुगावा लागला नसून हा खून आहे की, आत्महत्या याबाबत अद्यापही संभ्रम आहे. मात्र, लॉकडाउनच्या काळात ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिस उपनिरीक्षक तुषार नेवारे, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण आदींनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.

खदान पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद
रेल्वे पटरी जवळ आढळलेल्या मृतक व्यक्तीचे नाव भगवान नारायण पाईकराव, (वय 65 वर्षे रा. कवडे नगर, सिंधी कॅम्प) हे सोमवारपासून हरविलेल्या आहेत. त्यांचे मानसिक संतुलन ठीक नसून ते सतत पायी चालतात आणि त्यांना कोणी विचारलं तर ‘घरी चाललो’ फक्त एवढच होते. स्वतःचं नाव सुद्धा सांगू शकत नाही, ही व्यक्ती मिळून आल्यास पोलिस स्टेशन खदान येथे खालील क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२७ वर्षांची सर्विस, कॉन्स्टेबलचा DSP बनला; जमवली ३०० कोटींची माया, ८ ठिकाणी छाप्यात सापडले नोटांचे बंडल

Nagpur Ganesh Visarjan,: डीजे, लेजर लाईटवर पोलिसांची करडी नजर; ठाणेनिहाय ४४ ध्वनी मापक यंत्रे

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

SCROLL FOR NEXT