The brewery issue has come up again at Chandrapur district 
विदर्भ

वाघीण, दोन बछड्यांचा बळी गेल्यानंतर दारूभट्ट्याचा मुद्दा ऐरणीवर, काय आहे संबंध?

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : ताडोबा-व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात दारूतस्करांनी विषप्रयोग करून वाघीण आणि तिच्या दोन बछड्यांचा बळी घेतला. त्यानंतर जंगल आणि शेतशिवारातील दारूभट्ट्याचा मुद्दा ऐरणीवर आला. आता मोहफुलांची दारूभट्टी चक्क चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती भागात पोचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

मागील अनेक दिवसांपासून येथे मोहफुलाची दारू गाळल्या जात होती. या प्रकरणात  पोलिसांनी दोघांना अटक केली. येथील शहरातील मध्यवर्ती भागातील जलनगर वॉर्डातील  खंजहर मोहल्लात पोलिसांनी आज कारवाई केली. दारूविक्री आणि तस्करीसाठी खंजहर  मोहल्ला प्रसिद्ध आहे. टाळेबंदीच्या काळात तळीरामांचे तहान भागविण्याचे हेच हक्काचे  ठिकाण होते. विशेष म्हणजे अख्या चंद्रपूर शहरालाच खंजहर मोहल्लयात दारूमिळते याची  माहिती आहे. मात्र पोलिसांच्या कानावर बातमी पोचत नाही. सहा महिन्यांत एखादी  एखाद्या कारवाईचा सोपस्कार पोलिस पार पाडतात.

तीन दिवसांपूर्वीच याच मोहल्यात एका चारचाकी वाहनात दारू पकडली. ही दारू मध्य  प्रदेश येथून आली होती. राज्याच्या जिल्ह्याच्या सीमा सील आहे. अनेक ठिकाणी चौक्‍या  लागल्या आहे. हे सर्व अडथळे पार करून दारू सुखरूप चंद्रपुरात पोचली आणि स्थानिक  गुन्हे शाखेच्या हाती लागली.

दरम्यान, चार दिवसांपूर्वी वाघीण आणि दोन बछड्यांच्या मृत्यू प्रकरणात काही लोकांना  अटक केली. अटकेतील आरोपींनी दिलेल्या माहितीने वनविभाग हादरले. ताडोबा बफर  क्षेत्रात या लोकांनी मोहफुलाच्या दारूची भट्टी लावली होती. येथे वाघीणीचा वावर होता.  तिला मारण्यासाठी आधी रानडुकराला मारून त्यावर विषारी औषध टाकले. वाघीण आणि  तिच्या बछड्याने ते रानडुक्कर खाल्ले आणि त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर जंगलातील  मोहफुलाच्या दारूभट्ट्या चर्चेत आल्या.

पोलिस, उत्पादन शुल्क विभाग आणि वनविभागाने हातभट्या शोधण्याची कारवाई सुरू  केली आहे. टाळेबंदीत मोहफुलाच्या हातभट्टयांचे पीक आले होते. आजवर हा सर्व प्रकार  जंगल आणि शेतशिवारात असायचा. मात्र प्रथमच चंद्रपुरातील मध्यवर्ती भागात पोलिसांना  हातभट्टी मिळाली. रामनगर पोलिसांनी दारू तस्करांना शोधण्यासाठी मोहीम सुरू केली  आहे.

त्याअंतर्गत त्यांनी खंजहर मोहल्ल्यात दारूतस्कारांचा शोध घेतला. तेव्हा बरसा खंजहर  आणि सुनील खजंहर यांच्या घरी मोहफुलाची हातभट्टीच मिळाली. त्यांच्याकडून गॅस  सिलिंडर, मोहफुलाचा सडवा, आणि मोठे ड्रम पोलिसांनी जप्त केले. दोन लाख रुपयांची  रोकड आरोपींकडे मिळाली.

विशेष म्हणजे चंद्रपुरातील शहर आणि रामनगर पोलिस  ठाण्यापासून खजंहर मोहल्ला अगदी एक-दीड किलोमीटर अंतरावर आहे. येथे पोलिसांची  नेहमीच गस्तही असते. परंतु मोहफुलांच्या सडव्याचा गंध पोलिस प्रशासनाच्या नाकात  आजवर घुसला नाही. आता संघटित दारूतस्करीचे प्रकरण समोर आले आणि गृहमंत्र्यांकडे  तक्रारीचा पाऊस सुरू झाला. त्यानंतर पोलिसांना दारूचा वास यायला लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swami Samarth: स्वामी समर्थ महाराज स्वत: आशीर्वाद देताना... AI VIDEO व्हायरल, दर्शन चुकवू नका

आजचे राशिभविष्य - 18 सप्टेंबर 2025

सोलापुरात नवरात्रोत्सवही डीजेमुक्तच होणार! मध्यवर्ती मंडळांच्या एकाही पदाधिकाऱ्यांकडून ‘डीजे’ची नाही मागणी; पोलिस आयुक्त म्हणाले, साऊंड स्पीकरला परवानगी, पण...

अग्रलेख : चालढकल पुरे

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT