bride solved paper even in her marriage ceremony in yavatmal 
विदर्भ

परीक्षेसाठी थांबली मंगलाष्टके, पेपर संपताच नववधू चढली बोहल्यावर

रामदास पद्मावार

दिग्रस (जि. यवतमाळ) : लग्नाचा मुहूर्त दुपारी 12 वाजता ठरलेला असताना वऱ्हाडी उशिरा पोहोचले. आधी मंगलाष्टके की, नवऱ्या मुलीचा ऑनलाइन पेपर, यावर वधूसह नातेवाईक विवंचनेत सापडले. नवरदेवदेखील बोहल्यावर चढण्याच्या प्रतीक्षेत असताना आधी पेपर सोडवायचा आणि नंतर विवाह सोहळा पार पाडायचा, असा निरोप पाठविला. नवरदेवाकडील मंडळींनीही तत्काळ होकार भरला. मेहंदी लागलेल्या हाताने नवऱ्या मुलीने आधी ऑनलाइन पेपर सोडविला. त्यानंतर दोघेही बोहल्यावर चढले आणि मंगलाष्टकांचा सूर वऱ्हाडींच्या कानावर पडला.

दिग्रस येथील सारिका अरुण शिखरे हिचा विवाह अमरावती येथील नीलेश साबळेसोबत गुरुवारी (ता.24) दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आला होता. विवाहाचा मुहूर्त टळून गेल्यावर अमरावतीवरून वऱ्हाडी दुपारी दीडच्या दरम्यान पोहोचले. नवरदेव तयारी करून मारोतीच्या पारावर पोहोचला व दर्शन घेऊन लग्नमंडपात आला. लग्नाला आधीच दोन तास उशीर झाला. त्यामुळे पाहुणे मंडळीला मंगलाष्टकांची प्रतीक्षा होती. पेपरची वार्ता मंडपात पोहोचली. सर्वांनीच पेपर होईपर्यंत थांबणे पसंत केले. नवरीने आनंदाने आपल्या वर्गमैत्रिणींसोबत ऑनलाइन पेपर सोडविला, नंतरच ती बोहल्यावर चढली. दोन्हीकडील मंडळींनी शिक्षणाला दिलेले महत्त्व बघता कौतुक होत आहे.

क्षणाचाही विलंब नाही -
सारीकाचा बीएस्सी अ‌ॅग्रीकल्चरच्या सहकार विषयाचा ऑनलाइन पेपर दुपारी दोन ते 2.40 वाजेपर्यंत असल्याचा निरोप पाठविण्यात आला. आधी पेपर सोडवू, नंतर विवाह सोहळा पार पाडू, असा निरोप देण्यात आला. क्षणाचाही विलंब न करता नवरदेवासह नातेवाइकांनी पेपर सोडविण्याला संमती दिली. सारीकाने पेपर सोडविला. त्यानंतर ती बोहल्यावर चढली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

WI vs ZIM, T20 WC: वेस्ट इंडिजचा विजय अन् टीम इंडिया स्पर्धेबाहेर? झिम्बाब्वेविरुद्धच्या निकालाने सर्व गणित बिघडले, आता फक्त आणि फक्त...

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

Congress spokesperson assaulted Video : काँग्रेस प्रवक्त्यास पुण्यात मारहाण!, प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी ट्वीट केला घटनेचा व्हिडिओ

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT