brother end brothers life in Amravati Crime News  
विदर्भ

एकमेकांना चिडवण्याच्या वादातून चुलत भावाच्या डोक्यात बत्त्यानं वार करून हत्या; पती-पत्नीसह वृद्धेला अटक

संतोष ताकपिरे

अमरावती ः येथील हमालपुऱ्यात करण बारच्या गल्लीत चिडविण्याच्या वादातून सख्या चुलतभावाचा खून करण्यात आला. रविवारी (ता. 14) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. कैलास मोहन अजबे (वय 38, रा. हमालपुरा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

राजापेठ पोलिसांनी याप्रकरणी सुनील माणिक अजबे (वय 36), रेणुका सुनील अजबे (वय 31) व सुनीलची आई रुख्मा माणिक अजबे (वय 62, सर्व रा. हमालपुरा) या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला, असे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले. 

शनिवारपासून (ता.13) परस्परांना डिवचण्याच्या कारणावरून सुनील व कैलास या चुलतभावांमध्ये वाद सुरू झाला. सुनीलच्या आईने राजापेठ ठाण्यात आदल्या दिवशीच्या वादाची तक्रार केली होती. त्यानंतर शनिवारी सायंकाळी पुन्हा एकाच परिसरात राहणाऱ्या या दोघांमध्ये शाब्दिक चकमक व झटापट झाली. 
एकमेकांना शिवीगाळ केली. 

आज रविवारी सकाळी पुन्हा सुनील व कैलास या दोघांमध्ये वाद सुरू झाला. कैलासच्या घरासमोर साडेदहाच्या सुमारास सुनील, त्याची पत्नी व आई असे तिघे जण आले. आधी त्या दोघांमध्ये झटापट झाली. सुनीलच्या पत्नीने कैलासच्या डोक्‍यावर लोखंडी बत्त्याने वार केला. त्यामुळे जमिनीवर कोसळलेल्या कैलासच्या छातीत सुनीलने चाकू खुपसला, असा आरोप आहे. पोलिसांनी गंभीर जखमी कैलास याला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान कैलासचा काही मिनिटांतच मृत्यू झाला. 

हमालपुऱ्यात खुनाच्या घटनेनंतर या गल्लीत जमाव जमला. मृत कैलासची पत्नी कांचन कैलास अजबे हिच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी सुनील, त्याची पत्नी रेणुका व आई रुख्मा अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. झटापटीमध्ये खुनाचा गुन्हा दाखल झालेला सुनीलही जखमी झाला. 

क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये सुरू असलेला वाद हत्येसाठी कारणीभूत ठरला. हत्या केल्यानंतर रक्ताने भरलेला चाकू सुनीलने येथील सार्वजनिक विहिरीत फेकला.
-मनीष ठाकरे, 
पोलिस निरीक्षक, राजापेठ ठाणे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tesla Roadster Video : 'हवेत उडणारी कार'? Elon Musk यांनी स्वप्न प्रत्यक्षात उतरवले; सेकंदात ६०ची स्पीड अन् ग्रॅव्हिटीची ऐशीतैशी...

Sunlight at Night: आता रात्रीही मिळणार सूर्यप्रकाश! अमेरिकेची कंपनी भारताच्या मदतीने अंतराळात पाठवणार ‘स्पेस मिरर’... कसं करणार काम?

Navi Mumbai: १० टक्के पाणीकपात हटणार, नवी मुंबईत २४ तास पाणीपुरवठा मिळणार; गणेश नाईकांची मोठी घोषणा

Marathi News Live Updates: निळवंडे धरणातून प्रवरा नदीत पाणी सोडले, उत्तर अहिल्यानगरमधील नागरिकांना मोठा दिलासा; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याची आशा

Water Conservation: दुष्काळी धाराशिवला ‘एआय’चे वरदान! उसासाठी पाण्याचा भरमसाठ उपसा टळला; ७७० शेतकऱ्यांच्या प्रयोगाने बदलले चित्र

SCROLL FOR NEXT