अमरावती : आपलेही एक हक्काचे घर असावे, असे सर्वसामान्यांचे स्वप्न असते. मोठ्या शहरांमध्ये भूखंड घेऊन घर बांधण्याच्या सर्वसामान्यांच्या इच्छापूर्तीचा मार्ग ठप्प झाला आहे. असे असताना आता छोट्या घरकुलांसाठीदेखील बांधकामाचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. वाळू, लोखंड आणि सिमेंटच्या दरात झालेली वाढ बघता स्वतःचे घरकुल उभारण्याचे स्वप्न महागले आहे.
लॉकडाउननंतर वाळू, सीमेंट व लोखंडाच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. वाळूघाटाचे लिलावच झालेले नसताना सिमेंटचे दर मोठ्या प्रमाणावर चढले आहेत. नामांकित सिमेंट कंपनीची २२५ रुपयांना मिळणारी बॅग आता वाहतूक खर्चासह ३५० ते ४०० रुपयांवर पोहोचली आहे. रिअल इस्टेटचे क्षेत्र सध्या लॉकडाउननंतर स्थिरावत आहे. बांधकाम प्रकल्प सुरू होत आहेत. अशा स्थितीत वर्षभरात तिसऱ्यांदा सिमेंटचे दर वाढले आहेत. त्याचा परिणाम बांधकाम शुल्कावर झाला आहे. बांधकाम शुल्क वाढणे आजघडीला कुणालाही परवडणारे नाही. बांधकाम शुल्क वाढल्यास विक्री स्वस्तात होऊ शकणार नाही. एकत्रितपणे साखळी करून झालेली सिमेंटची दरवाढ शासनाने थांबवायला हवी, अशी भावना बांधकाम व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.
दरांमध्ये घट झाल्यास त्याचे चांगले परिणाम प्रकल्पविक्रीच्या रूपात दिसून येणार आहेत. स्वतंत्र भूखंड घेऊन बांधकाम करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे चित्र आज आहे. कंत्राटदारांनी बांधकामाच्या दरात प्रती चौरस फूट १५० ते २५० रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना छोटे घरकुल बांधणेही कठीण झाले आहे.
वाळूघाट बंद असल्याने दरवाढ
सिमेंटप्रमाणेच बांधकामातील महत्त्वाचा घटक असलेली वाळू प्रचंड महागली आहे. अमरावतीसह नजीकचे वाळूघाट अजून सुरू झालेले नाहीत. वाळूघाटाचे लिलाव झालेले नाहीत. त्यामुळे मध्य प्रदेशातून वाळू आणावी लागत आहे. परिणामी दळणवळण खर्च वाढला आहे. वर्षभरात सिमेंट व लोखंडाचे दर वाढल्याने त्याचा फटका बांधकामाला बसत आहे. बांधकाम दरात प्रतिचौरस फूट १५० ते २५० रुपये, अशी वाढ झाल्याचे क्रेडाई अमरावतीचे अध्यक्ष पंकज देशमुख यांनी सांगितले.
संपादन - नरेश शेळके
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.