The builders gave life to the peacock 
विदर्भ

राष्ट्रीय पक्षी मोराला दिले जीवदान, वाचा बांधकाम करणाऱ्यांच्या अनोख्या भूतदयेबद्दल

लखन बागडे

बोरी अरब, (जि. यवतमाळ) : येथे आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास शमिउल्ला खान व जुनेद खान हे दोघे नेरवरून बोरी अरब येथे बांधकामाकरिता येत असताना त्यांना विठ्ठल मंदिराजवळ जखमी अवस्थेत मोर दिसला. त्यांनी लगेच त्या मोराला उचलून बोरी अरब मस्जिदपुरा येथे वकार अहमद, जुबेर अहमद, इशरत खान, संजू बेलगमवार यांच्याकडे सोपवून जीवदान दिले.

जखमी मोरावर त्वरित उपचार झाल्याने त्याचा जीव वाचला. बांधकाम करणाऱ्यांनी प्रसंगावधान राखत मोराला उचलून आणले म्हणून त्याचा जीव वाचल्याची चर्चा परिसरात होती. त्यांनी ज्या नागरिकांना मोर दिला त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्याच्या उपचारासाठी धावपळ केली.

त्यांनी बोरी येथील शिवसेना उपशहरप्रमुख एरार अहमद शेख यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी मोराला स्वतः घरी पिंजऱ्यात ठेवून वनविभाग दारव्हा येथील चेतन नेहारे वन परिक्षेत्र अधिकारी फिरोज खान यांच्याशी संपर्क साधला. तोतया अधिकारी येऊ नये यासाठी त्यांनी आय कार्ड आणि वनविभागाच्या गणवेशात येण्यास सांगितले.

अन्यथा आम्ही त्याला जंगलात नेऊन सोडून देऊ, असेही स्पष्ट केले. जवळचा वनविभाग म्हणून लाडखेड येथे संपर्क साधला असता लाडखेड येथील आर. पी. बागडे व त्यांचा शिपाई यांनी ताबडतोब येऊन यांनी जखमी अवस्थेतील मोराची पाहणी केली. त्याचा पंचनामा केला व पंचनामा केल्यानंतर याला पशुवैद्यकीय दवाखाना लाडखेड येथे नेले तेथे तपासणी केली. योग्य उपचार करून मोराला जीवदान देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arijit Singh Retirement : अरिजीत सिंहचा मोठा निर्णय! ‘Playback Singing’ मधून अचानक ‘रिटायरमेंट’ ; लाखो चाहत्यांना धक्का

Pune Tax Hike: निवडणूक झाली, आता पुणेकरांचा प्रॉपर्टी टॅक्स वाढणार! 'एवढ्या' करवाढीचा प्रस्ताव; 10 वर्षांपासून झाली नाही वाढ

Pune Water Supply: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! दुरुस्तीच्या कामामुळे 'या' दिवशी शहराचा पाणीपुरवठा बंद

CM Yogi Adityanath : उत्तर प्रदेशातील शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून गौरव

Himachal Pradesh Loyal Dog Video : ...अन् ‘हे’ मन हेलावणारं भावनिक दृश्य पाहून, बचाव पथकाच्या डोळ्यातही आलं पाणी!

SCROLL FOR NEXT