Buldana corona visit of home minister and battel of mla in khamgaon 
विदर्भ

‘त्यांनी’ आमदारकीचा राजीनामा द्यावा, अन्यथा ‘मी’ राजकीय संन्यास घेईन!  कोण म्हणाले पहा!

सकाळ वृत्तसेेवा

खामगाव (जि.बुलडाणा) ः राज्याचे गृहमंत्री अनील देशमुख २८ एप्रिल रोजी नागपूरवरुन मुंबई येथे जात असताना त्यांनी  खामगाव येथे कोरोना व्हायरस संदर्भात माहिती जाणून घेतली. तेथून ते मुंबईसाठी निघत असताना भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार आकाश फुंडकर यांनी गृहमंत्री यांच्याकडे अवैध दारु विक्री होत असल्याबाबत निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. मात्र, ही तक्रार खोटी निघाली तर फुंडकरांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अन्यथा मी राजकीय संन्यास घेईन, असे आव्हान काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार  सानंदा यांनी भाजपचे आमदार आकाश फुंडकरांना केले आहे.

दारु विक्रीबाबत आमदार ॲड. आकाश फुंडकरांनी गृहमंत्री यांना तक्रारींचे निवेदन दिल्यानंतर माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी त्यांना खुले आव्हान दिले आहे.
आमदार फुंडकर हे भाजपचे जिल्हाध्यक्ष असतांना त्यांनी गृहमंत्र्यांची भेट घेऊन कोरोना विषाणू संसर्गावर लावण्यात आलेल्या संचारबंदीत शिथीलता द्या, बुलडाणा जिल्हयातील क्वारंनटाईन असलेले पोलीस कर्मचारी यांना शासनाच्या वतीने मदत द्या, बेरोजगारांना मदत करा अशा समस्या मांडणे अपेक्षीत होते. परंतू, त्यांनी तसे न करता त्यांच्या चेल्या चपाटयांच्या दारु दुकानांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कारवाई झाल्यामुळे त्यांनी अवैध दारु विक्रीबाबत वेळेची भान न ठेवता केलेली तक्रार ही  त्यांच्या बौध्दिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. त्यानंतर सानंदांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांना पत्र देऊन फुंडकरांनी दिलेल्या तक्रारीची निर्भिड व निसंकोचपणे चौकशी करा, पण चौकशीपुर्वी तक्रार खरी आहे याबाबत त्यांचे बयान किंवा आवश्यक वाटल्यास त्यांच्याकडून प्रतिज्ञालेख लिहून घ्या, अशी पत्रान्वये विनंती केली आहे.

तर तक्रारी संदर्भात इलेक्ट्राॅनिक मिडीया व पत्रकारांना प्रतिक्रिया देतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी सांगितले की, फुंडकरांनी केलेली तक्रार  खोटी निघाली तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अन्यथा मी राजकीय संन्यास घेईन, असेही सानंदांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT