Governor bhagat singh Koshyari
Governor bhagat singh Koshyari  sakal
विदर्भ

बुलडाणा : लाईफ सेव्‍हर अवॉर्डने डॉ.गजानन पडघान सन्मानित

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : कोरोना महामारी च्या काळात रक्तदान सारख्या महत्त्वपूर्ण व अत्यावश्यक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल निमा व नीफी संघटनेला आंतरराष्ट्रीय लाईफ सेवर अवॉर्ड मिळाला आहे. याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांचा पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मान केला. बुलडाणा निमा च्या वतीने डॉ. गजानन पडघान यांनी हा सन्मान स्वीकारला.

निमा संघटना सातत्याने आरोग्य क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवीत असते. याचाच एक भाग म्हणून २३ मार्च २०२१ ला हुतात्मा दिनाच्या निमित्ताने संवेदना या बॅनरखाली भव्य रक्तदान शिबिरांचे भारतभर आयोजन करण्यात आले होते. निमाच्या १५०० शाखांनी यामध्ये सहभाग घेऊन १ लाख ६ हजार बॉटल रक्त संकलित केले होते. हे जागतिक रेकॉर्ड होते. एका दिवसात एखादी संघटना एक लाखाच्या वर जणांकडून रक्तदान करून घेते, ही बाब निश्‍चितच गौरवास्पद होती. यामुळे या उपक्रमाची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. यानिमित्ताने राज्यपालांच्या वतीने या सन्मान सोहळ्याचे आयोजन राज्यपालांच्या निवासस्थानी करण्यात आले होते.

विशेष म्हणजे कोरोना सारख्या महामारी च्या काळात रुग्णांना अत्यंत आवश्यकता असताना संस्थेने संघटनेने हा उपक्रम आयोजित केल्याने त्यांचे विशेष कौतुक झाले आहे. निमा ही संघटना सातत्याने सामाजिक बांधिलकी जपणारी संघटना आहे. आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिर आयोजित करणे, लेक वाचवा सारखे उपक्रम राबविणे सातत्याने सुरू असते. या पुरस्कारामुळे व जागतिक स्तरावर नोंद झाल्यामुळे निमा संघटनेचा सामाजिक कार्याला मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.

सर्वांच्या सहकार्याने शक्य

सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना संपूर्ण संघटना व सहकारी पाठीशी असले म्हणजे कोणतीही गोष्ट अशक्य नसते. रक्तदानाच्या या महायज्ञा मध्ये निमासह इतर सामाजिक संघटना, निमा वुमेन्स फोरम निमाच्या सर्वच पदाधिकार्‍यांनी व सदस्यांनी हिरिरीने सहभाग घेतल्याने हे शक्य झाल्याचे डॉ. गजानन पडघान यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT