विदर्भ

Buldhana Constituency Lok Sabha Election Result: बुलडाण्यात तुपकरांचा ठाकरेंना झटका; शिंदे गटाचे प्रतापराव जाधव विजयी

Buldhana Lok Sabha Election Result 2024 Shiv sena Pratap Jadhav Shiv sena wins : या ठिकाणी तिरंगी लढत झाली असून शिंदे गटाचे प्रतापराव जाधव, ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर मैदानात होते.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Buldhana Lok Sabha Election Result 2024 : बुलढाणा लोकसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेच्या फुटीमुळं परिस्थिती बदलली होती. त्यामुळं या फुटीचा फायदा अपक्ष आमदार रविकांत तुपकरांना होईल असं वाटतं होतं. पण इथल्या जनतेनं शिंदेंचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना पसंती दिल्यानं त्यांचा विजय झाला आहे.

बुलडाणा लोकसभेत बुलढाणा आणि मेहकर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे, खामगाव, जळगाव जामोद आणि चिखलीत भाजपचे, तर सिंदखेडराजा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. लोकसभा मतदारसंघावर गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसेनेचा ताबा आहे. पण यंदा शिवसेनेत फूट पडल्यानं इथं महायुतीकडून शिंदेंच्या सेनेचे प्रतापराव जाधव तर महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या सेनेचे नरेंद्र खेडेकर यांच्यात लढत होत आहे.

पण तिसरा फॅक्टरही इथं महत्वाची भूमिका बजावत आहे. तो म्हणजे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर. शेतकरी नेते म्हणून तुपकर अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. बुलडाण्यात शेतकरी वर्ग मोठा असल्यानं इथं तुपकरांची देखील हवा होती.

यंदा किती झालं मतदान?

बुलडाण्यात यंदा ६२.०३ टक्के इतकं मतदान झालं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही टक्केवारी वाढली आहे. पण गेल्यावेळी बुलडाण्यात वंचित बहुजन आघाडी फॅक्टर महत्वाचा ठरला होता. त्यामुळं राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला आणि शिवसेनेचे प्रतापराव जाधव निवडून आले होते. यंदाही वंचित फॅक्टर इथं महत्वाचा ठरणार आहे.

२०१९ मध्ये अशी होती स्थिती?

प्रतापराव जाधव (शिवसेना) विजयी मते : ५,२१,९७७

डॉ. राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी काँग्रेस) मते : ३,८८,६९०

बळीराम शिरसकर (वंचित बहुजन आघाडी) मते : १,७२,६२७

नोटा मते : ७,६८१

विजयी उमेदवारांचे मताधिक्य : १,३३,२८७

यंदाच्या निवडणुकीत गाजलेले मुद्दे

खामगाव जालना रेल्वे मार्ग

खारपानपट्ट्यामुळे होणारे आजार, पाण्याचा गंभीर प्रश्न

लोणार सरोवर संवर्धन आराखडा

सिंदखेडराजा जिजाऊ जन्मस्थळ विकास आराखडा

जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या मुलांना शहराचा औद्योगिक विकास

रोजगाराचा प्रमुख विषय

विधानसभा क्षेत्रात झालेलं मतदान

बुलडाणा - ५३.९६ टक्के

चिखली - ६२.२१ टक्के

जळगाव जामोद - ६३.५८ टक्के

खामगाव - ६६.२७ टक्के

मेहकर - ६४.८४ टक्के

सिंदखेडराजा - ६१.३४ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Municipal Election : धुळ्यात भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी 'महायुद्ध'; ६० जागांसाठी तब्बल ५५० इच्छुक मैदानात!

Silent Heart Attacks in Women: छातीत दुखत नाही, तरी हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितला महिलांमधील लपलेला धोका

Latest Marathi News Live Update : भारत आणि श्रीलंका महिला संघात आज पाचवा टी२० सामना

Koregaon Bhima Vijay Stambh : कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी पाच हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त; सीसीटीव्ही व ड्रोनद्वारे नजर!

Palghar News : तीन महिने उलटूनही नुकसान भरपाई नाही; ई-केवायसीच्या अडथळ्यांमुळे मोखाड्यातील शेतकरी कर्जबाजारी!

SCROLL FOR NEXT