विदर्भ

Video : रस्ता नसल्याने नागरिकांनी चिखलात बसून केले आंदोलन

सकाळ डिजिटल टीम

बुलढाणा : नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे घाणीच्या साम्राज्यात राहत असलेल्या नागरिकांनी थेट चिखलात बसून आंदोलन करत, नगरपालिकेचे लक्ष वेधले आहे. जिल्ह्यातील मोताळा शहरात हे लक्षवेधी आंदोलन झाले आहेत.

आरोग्य धोक्यात
मोताळा शहरात नगरपरिषदच्या दुर्लक्षतेमुळे अनेक वस्त्यांमध्ये घाणीचे साम्राज्य वाढले आहे. शहरवासीय मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. मोताळा शहरात नाला, रस्ते नाहीत दिवाबत्ती नसल्याने रात्री अनेक ठिकाणी अंधार असतो. त्याचबरोबर पावसाळ्याच्या दिवसांत नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दर वर्षी नगरपालिका सक्तीने कर वसुली करते त्या बदल्यात सुविधा काहीच देत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे नागरिकांनी नगरपालिकेचा निषेध करत चिखलात बसून आंदोलन केले आहे. जोपर्यंत नगरपालिका दखल घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील असा पावित्रा नागरिकांनी घेतला आहे.

मुलाचा झाला मृत्यू
काही दिवसांपूर्वी या परिसरात घाणीमुळे झालेल्या संसर्गातून एका मुलाचा मृत्यू झाला आहे. नाल्यांची सुविधा नाही, रस्त्यांवर चिखल यांमुळे परिसरात रिक्षा आणि इतर कोणतिही वाहने येत नाहीत. परिसरातील वृद्धांना दवाखान्यात घेऊन जाणेही शक्य होत नाही, अशी तक्रार नागरिक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar News: पालघरचा चेहरा-मोहरा बदलणार! ३०० एकरवर वन उद्यान उभारणार; पालकमंत्र्यांनी प्लॅनच सांगितला

Crime: आरजेडीला मत का नाही दिले? आधी वाद घातला, नंतर वृद्धाला क्रूरपणे संपवलं, घटनेनं खळबळ

Jalgaon News : जळगाव महापालिकेत 'भाजप विरुद्ध सर्व'! भाजप वगळता सर्वांशी युती, महाविकास आघाडीचा निवडणुकीसाठी मोठा निर्णय

Jalgaon Cyber Fraud : एकाने गमावले ४.६१ लाख तर, दुसऱ्याने ५.३५ लाख! जळगावात ऑनलाइन फसवणुकीचे वाढते प्रकार

IND A vs SA A: रिषभ पंतच्या टीम इंडियाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय, तब्बल ४१७ धावांचं लक्ष्य गाठून मालिकेत बरोबरी

SCROLL FOR NEXT