Youth killed due to children dispute cidco nashik crime news esakal
विदर्भ

Buldhana Police Death: तीन वर्षांच्या मुलीसह पोलीस पत्नीचा खून करुन पतीचा गळफास; बुलडाण्यातील थरारक घटना

पोलीस या भीषण घटनेचा सखोल तपास करत असून यामागील कारण...

सकाळ डिजिटल टीम

चिखली : बुलडाण्यात एका महिला पोलिसाचा आपल्या तीन वर्षांच्या मुलीसह घरात मृतदेह आढळून आला आहे. तर याच महिलेच्या पतीचा मृतदेह १५ किमी अंतरावर एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली आहे. पतीनेच पत्नी अन् मुलीचा खून करुन आत्महत्या केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. (Buldana Famale Police found dead at home with daughter husband body on tree 15 kms away)

पोलिसांच्या माहितीनुसार, चिखली शहरातील पंचमुखी महादेव मंदिराच्याजवळ महिला पोलीस कॉन्स्टेबल वर्षा कुटे आणि त्यांच्या तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. धारदार शस्त्रानं या दोघींचा खून करण्यात आला. (Latest Marathi News)

प्राथमिक माहितीनुसार, या महिलेचा पती किशोर कुटे यानंच आपल्या पत्नी आणि मुलीचा खून केला आणि त्यानंतर त्यानं चिखलीपासून १५ किमी अंतरावरील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पण यावेळी या व्यक्तीची ८ वर्षांची दुसरी मुलगी शाळेत गेलेली असल्यानं ती या भीषण घटनेतून बचावली आहे. (Marathi Tajya Batmya)

चिखली पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून अधिकारी याचा सखोल तपास करत आहेत. तसेच या भीषण घटनेमागे काय मोटिव्ह असेल याचा शोध घेतला जात आहे.

स्थानिकांनी किशोर आणि वर्षा कुटे यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. तसेच त्या दोघांच्या नात्यात कुठलीही कटुता नव्हती हे एक चांगल दाम्पत्य होतं, अशी प्रतिक्रिया दिली आहे. पण या हत्यांमागे नेमकं कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? मोठ्या पावसाचा इशारा नाही

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत भयानक पाऊस; २४ तासांत ५० गावांचा संपर्क तुटला

भारताला LPG पुरवठा करणारा अमेरिका ठरला सर्वात मोठा देश; US अधिकारी म्हणाल्या, ‘एनर्जी सप्लायर बनल्याचा आनंद’

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

SCROLL FOR NEXT