विदर्भ

शेतकऱ्यांसाठी उभी केली राइस मिल अन् ४० जणांना दिला रोजगार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अनेकजण वैयक्तिक लाभासाठी किंवा उद्योग विस्तारासाठी, जीवनात यशस्वी होण्यासाठी उद्योग उभारतात. परंतु, समाजातील काही सुहृदही नागरिक लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी एखादा व्यवसाय उभारतात. गडचिरोली जिल्हास्थळापासून ३४ किमी अंतरावरील पोटेगाव येथे सध्या डौलात उभी असलेली राइस मिल (Rice Mill at Potegaon), अशाच सामाजिक बांधीलकीतून उभारण्यात आली आहे. श्री गोंडवाना राइस मिल नावाची ही राइस मिल (set up a rice mill) हेमंत जंबेवार यांनी उभारली आहे. या उद्योगामुळे परिसराच्या १८ किमी परिसरातील जवळपास ४० ते ४५ गावांतील गरीब, आदिवासी शेतकऱ्यांची मोठी समस्या सुटली (The problem of the farmers was solved) आहे. हेमंत जंबेवार असे राइस मिल उभारणाऱ्याचे (Businessman) नाव... (Businessman-set-up-a-rice-mill-in-Gadchiroli-for-the-farmers)

गडचिरोली जिल्ह्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मात्र, येथे राइस मिल नसल्याने शेतकऱ्यांना बैलबंडी किंवा ट्रॅक्‍टरने कुनघाडा किंवा घोट या लांब अंतरावरील ठिकाणी धान घेऊन जावे लागत आहे. मात्र, येथे स्थानिक शेतकऱ्यांना आधी प्राधान्य मिळायचे. धान घेऊन आशाळभूत नजरेने राइस मिलकडे बघणाऱ्या पोटेगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या नशिबी यायचा तो केवळ दीर्घकाळ प्रतीक्षेचा प्रसंग. कधी-कधी दोन ते तीन दिवस तिथेच मोडायचे. हातावर आणून पानावर खाणाऱ्या गरीब शेतकऱ्यांचे हाल व्हायचे. घरून आणलेली मीठभाकर खाऊन ते आपला क्रमांक येण्याची वाट बघत बसायचे.

जिल्ह्यात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठे नाव असलेले हेमंत जंबेवार यांच्याकडे येथील शेतकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडले. ही समस्या सरकार दरबारी सुटणारी नाही, हे त्यांना ठाऊक होते. म्हणून हेमंत जंबेवार यांनी २०१८ मध्ये स्वत:च आडवळणाच्या पोटेगाव या गावात राइस मिलची स्थापना केली. त्यामुळे या परिसरातील ४० ते ४५ गावांतील शेतकऱ्यांना धान अगदी जवळच असलेल्या श्री गोंडवाना राइस मिलमध्ये आणता येते. त्यामुळे त्यांचा लांब अंतराचा फेरा, खासगी व्यापाऱ्यांचा ससेमिरा आणि दारूचे दुष्टचक्र हे सारेच त्रास संपले.

या मिलच्या माध्यमातून परिसरातील १८ ते २० स्थानिकांना रोजगारही मिळाला. राइस मिलची भरभराट होताच आजूबाजूला छोटी-मोठी दुकानेही झालीत. त्यामुळे या परिसराचा कायापालटच झाला आहे. याशिवाय येथील अनेक समस्या सोडविण्यासाठी हेमंत जंबेवार पुढाकार घेतात. त्यामुळे पोटेगाव, चांदाळा, सावेला, मारोडा, गुरवळा अशा अनेक गावांतील शेतकरी, आदिवासी व गोरगरिबांसाठी ते मोठा आधार ठरले आहेत.

४० पेक्षा अधिक लोकांना रोजगारही मिळाला

पोटेगाव येथील हेमंत जंबेवार यांनी राइस मिल उभी करून तांदळ व्यवसायाला झळाळी दिली. ते एवढ्यावर थांबले नाही तर धान भरडाईसाठी दोन-दोन दिवस राइसमिलवर काढणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदतीची हात दिला. १८ किलोमीटरवर येथील शेतकरी भरडाईला जात होते. मात्र, गावात मिल सुरू झाल्याने लोकांचा वेळ आणि पैसाही वाचू लागला आहे. त्याच्या राइस मिल ४० पेक्षा अधिक लोकांना रोजगारही मिळाला आहे.

(Businessman-set-up-a-rice-mill-in-Gadchiroli-for-the-farmers)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper Train Speed Test Video : ताशी १८० किमी वेग तरीही काठोकाठ भरलेल्या ग्लासांमधून एकही थेंब पाणी सांडले नाही...!

Alcohol Tree : ऐकू ते नवलच! 'या' 3 झाडांपासून बनते दारू...लाखो लोकांना आजही नाही माहिती

INDW vs SLW, 5th T20I: दीप्ती शर्माने नोंदवला मोठा विश्वविक्रम अन् भारतानेही रोमांचक विजयासह श्रीलंकेला दिला व्हाईटवॉश

Horoscope : उद्यापासून त्रिपुष्कर योगसह बुधादित्य राजयोग; कन्यासह 5 राशींना तिप्पट धनलाभ, नवं वर्ष सुरू होताच 3 मोठी कामं होणार पूर्ण

New Money Rules : क्रेडिट स्कोअर ते UPI – १ जानेवारी २०२६ पासून बदलणार ७ मोठे नियम; तुमच्या खिशावर काय परिणाम?

SCROLL FOR NEXT