bang final 
विदर्भ

Video : दारू प्रश्नावरून बंग आणि वडेट्टीवारांमध्ये खडाजंगी

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात दारू विक्रीची दुकान उघडण्याचा निर्णय अतर्क्य आहे, अशी टीका डॉ. अभय बंग यांनी राज्यशासनावर केली होती. या टीकेचा  मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चांगलाच समाचार घेतला.  त्यांचे सामाजिक कार्य माेठे आहे. ते पंतप्रधान नरेंद्र माेदींना माहीत आहे.  त्यामुळे डॉ. बंग यांनी आता थेट पंतप्रधानांना सल्ला देऊन देशातच दारूबंदी करावी. त्यामुळे हा विषयच कायमचा बंद होईल. त्यामुळे वारंवार याविषयावर बोलण्याचा त्यांचा त्रास वाचेल, असा टोला वडेट्टीवार यांनी डॉ. बंग यांना हाणला.


 चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीचा आढावा घेण्यासाठी गठित समीतीवर यापूर्वी डॉ. बंग यांनी टीका केली होती. तेव्हाही वडेट्टीवार यांनी त्यांना प्रत्त्युत्तर दिले होते. आता पुन्हा दोघे आमाेरासमाेर आले. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर देशभरात टाळेबंदी सुरू आहे. टाळेबंदीच्या तिस-या टप्प्यात काही शिथिलता देण्यात आली. त्यात केंद्राने राज्यातील दारू दुकान सुरू करायला हिरवी झेंडी दाखविली. महाराष्ट्र शासनाने काही जिल्ह्यात दारूविक्रीला परवानगी दिली आहे. यावर डॉ. बंग यांनी टीका केली. दारूदुकान सुरू केल्यामुळे घरपोच कोरोना पोहोचविण्याची व्यवस्था झाली आहे. हा अतर्क्य निर्णय आहे, असे ते म्हणाले. यावर आता वडेट्टीवार यांनी टीकास्त्र सोडले.  डॉ. बंग यांचे सामाजिक कार्य फार माेठे आहे. त्यांसंदर्भात आवश्यकता पडेल तेव्हा बोलणारच आहे, असा अप्रत्यक्ष इशारा देत देशातच दारूबंदी करण्याचा सल्ला त्यांनी पंतप्रधान माेदींना द्यावा. त्यामुळे ही समस्याच कायमची संपून जाईल आणि त्यांना वारंवार यावर बोलावे लागणार नाही. सोबतच महसूल कसा वाढवावा याचे मार्गदर्शन पंतप्रधांनाना करावे, असा खोचक सल्लाही डॉ. बंग यांना दिला.

सविस्तर वाचा - दुकान उघडताच नागरिकांनी लावल्या रांगा, चाळीस दिवसांनंतर मिळाली संधी
डॉ. बंग यांच्या म्हणण्यानुसार  दारूमुळे दरवर्षी पाच लाख लोकांचा मुत्यू होतो. ही आकडेवारी आली कुठून. जी गोष्ट सरकारला माहीत नाही. त्या गोष्टीची खडानखडा  माहीती यांना असते, असा चिमटाही वडेट्टीवारांनी काढला.  सरकार चालविण्यासाठी पैशाची गरज असते.  त्यांची एनजीओ चालविण्यासाठी सुद्धा पैसा लागतो. त्यांचा मुलगा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कक्षात बसायचा. तेव्हाच डॉ. बंग यांनी राज्यातील दारूबंदी करण्याचा सल्ला फडणवीस यांना द्यायला हवा होता. त्यांचे अनंत उपकार महाराष्ट्रावर झाले असते, असा टोला वडेट्टीवार यांनी  डॉ. बंग यांना लावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Election : भाजपविरोधी मतांचे ध्रुवीकरण टाळण्यासाठी महाविकास आघाडीची मोठी खेळी

Latest Marathi News Live Update : पुण्यात काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती

Paradh News : दोन बांगलादेशीची स्वदेशात रवानगी; पोलिस ठाण्यात झाला होता गुन्हा नोंद

वैताग आलाय, लोक विचारतायत, बायको विचारतेय...; भाजपच्या निष्ठावंताला अश्रू अनावर, उमेदवारी नाकारल्यास आत्मदहनाचा इशारा

Winter Pregnancy Care: हिवाळ्यात गर्भातलं बाळही थंडी अनुभवतं! आई आणि बाळ सुरक्षित ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

SCROLL FOR NEXT