file photo 
विदर्भ

ते आले मुंबईवरून अन्‌ भद्रावतीत झाले क्वारंटाइन

सकाळ वृत्तसेवा

भद्रावती (जि. चंद्रपूर) : संताजीनगर येथील रहिवासी आर. एस. सिंग हे आयुध निर्माणी येथे खासगी ठेकेदार आहेत. त्यांची मुले मुंबई येथे वास्तव्यास आहेत. सोमवारी (ता. 13) त्यांची दोन मुले आशीष सिंग व मनीष सिंग हे त्यांच्या पत्नी व तीन वर्षाच्या मुलीसह भद्रावती येथील निवासस्थानी आले.

याची माहिती स्थानिक वॉर्डवासींनी नगराध्यक्ष अनिल धानोरकर व तहसील प्रशासनाला दिली. त्यामुळे तहसील कार्यालय व ग्रामीण रुग्णालयाची टीम सिंग यांच्या निवासस्थानी येऊन या नागरिकांची आरोग्य तपासणी करून गेली. त्यांच्या हातावर होम क्‍वारंटाइनचा शिक्काही मारला. पोलिस प्रशासनदेखील सिंग यांच्या घरी येऊन गेले. मात्र सिंग याच्या गाडीवर प्रेस असे लिहिले असून पत्रकार असल्याचे सांगून ते भद्रावतीला आले असल्याची माहिती आहे.

राज्यात लॉकडाउन असताना कसे आले

संपूर्ण राज्यात लॉकडाउन असताना सिंग कुटुंब एवढा प्रवास करीत शहरात आले. मात्र याबाबत सिंग कुटुंबीयांनी प्रशासनाला माहिती का दिली नाही, अशी चर्चा नागरिकांत आहे. राज्यात अमिताभ गुप्ता व वाधवान कुटुंब यांचे प्रकरण ताजे असतानाच हा प्रकार घडला.

होम क्वारंटाइन करून ठेवले
माहिती मिळाल्यावर मेडिकलची टीम पाठवून त्यांची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर त्यांना होम क्वारंटाइन करून ठेवले आहे. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करायचे की नाही, त्याबद्दल विचार सुरू आहे. प्रेस (Times of India) चे प्रतिनिधी असल्याचे त्यांच्याकडे ओळखपत्र आहे. नियमांचे पालन करण्यासंदर्भात त्यांना सूचना केल्या आहेत.
- महेश शितोडे, तहसीलदार, भद्रावती.

चंद्रपूरला रेफर करू
वैद्यकीय चमूने तपासणी केली आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळून आले नाही. चंद्रपूरला वरिष्ठांकडे माहिती दिली आहे. वरून आदेश आल्यावर त्यांना चंद्रपूरला रेफर करू. तोपर्यंत होमक्वारंटाइन करून ठेवले आहे.
- डॉ. कन्नाके, ग्रामीण रुग्णालय, भद्रावती.

तहसील कार्यालयाच्या सूचना आल्यावर कारवाई
ठाणे येथील पोलिस विभागाच्या डीआयजीचे परवानगीपत्र घेऊन ते आले आहेत. वैद्यकीय अहवाल व तहसील कार्यालयाच्या सूचना आल्यानंतरच आम्हाला कारवाई करण्याचे अधिकार आहेत.
- सुनीलसिंह पवार पोलिस निरीक्षक, भद्रावती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT