file photo 
विदर्भ

पहाटेपासूनच उमेदवारांची लगबग 

सकाळ वृत्तसेवा

अमरावती: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा दिवस जवळ येत असतानाच अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न सुरू आहे. रविवारी (ता.13) सुटीच्या दिवशीची संधी साधत सर्वपक्षीय उमेदवारांनी सकाळपासूनच मतदारांशी गाठीभेटीचा योग जुळवून आणला. 
विधानसभा निवडणुकीचे मतदान 21 ऑक्‍टोबरला असून त्यादृष्टीने उमेदवारांनी प्रचारात रंगत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पदयात्रा, मेळावे, मतदारांशी प्रत्यक्ष संवाद आदींच्या माध्यमातून आपली भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न उमेदवार व त्यांचे समर्थक करीत आहेत. रविवार वगळता अन्य दिवशी अनेक मतदार सकाळीच नोकरी किंवा व्यवसायानिमित्त घराबाहेर पडत असतात. त्यामुळे त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क होतोच असे नाही, त्यामुळेच रविवारचा सुटीचा दिवस पाहून उमेदवारांनी आपल्या गाठीभेटींचे नियोजन केले. केवळ पदयात्राच नव्हे तर कॉर्नर सभा, बैठकांचे नियोजनसुद्धा करण्यात आले. 

मुख्य चौकातूनच फेऱ्या
शहरातील प्रमुख परिसर गांधी चौक, जवाहरगेट, सराफा बाजार, भाजीबाजार, खरकाडीपुरा, अंबागेट, मुधोळकर पेठ, बालाजीप्लॉट, रुक्‍मिणीनगर, राजापेठ, शंकरनगर यासह अन्य भागांमध्ये प्रमुख उमेदवारांसह अपक्षांनी प्रचारफेरी काढली.

केवळ सहा दिवस 
जाहीर प्रचारासाठी आता उमेदवाराकडे केवळ सहा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. शनिवारी (ता.19) सायंकाळी प्रचारतोफा थंडावणार आहेत. त्यामुळे कमी वेळेत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान उमेदवारांपुढे आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'अटल सेतू' नंतर मुंबईत देशातील सर्वात लांब उड्डाणपूल बांधणार! पण कुठे अन् लांबी किती असणार? वाचा MMRDAचा नवा मास्टरप्लॅन

Women's World Cup: कसली, भारी इंग्रजी बोलते ही पोरगी! भारतीय महिलांनी वर्ल्ड कप जिंकला अन् Viral झाली ही... Video

'अमरेंद्र बाहुबली' री-रिलीज असूनही बाहुबली: द एपिकची रेकॉर्डब्रेक कमाई! प्रभासचा दबदबा कायम!

Mahur News : अचानक आलेल्या पुरातुन पर्यटक बालबाल बचावले....; नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील घटना

Stock Market Closing : शेअर बाजाराचा सपाट पातळीवर व्यवहार! पण Lenskart IPO ची मोठी मागणी! कोणते शेअर्स चमकले ?

SCROLL FOR NEXT