विदर्भ

गांजाचा धूर : झिंगणाऱ्‍या नशेमुळे लुटमार, खून, हाणामारी, चोरी

सूरज पाटील

यवतमाळ : शहराच्या गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांचा वावर (The involvement of minors in crime) वाढत चालला आहे. गांजा अवघ्या काही रुपयांत आणि सहज मिळत असल्याने शाळकरी मुले व्यसनाच्या आहारी (Children addicted) जात आहेत. व्यसन केल्यावर डोक्यात झिंगणाऱ्‍या नशेमुळे ही मुले लुटमार, खून, हाणामारी, चोरी अशी गुन्हे करीत आहेत. त्यामुळे गांजाचा धूर अल्पवयीन मुलांसाठी धोकादायक ठरत आहे. (Cannabis-smoke-is-dangerous-for-minors)

यवतमाळ आणि गुन्हेगारी हे समीकरण झाले आहे. त्यातच गुन्हेगारी वर्तुळात अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढला आहे. विशेष म्हणजे शाळेत जाणाऱ्‍या मुलांना गुन्हेगारीचे आकर्षण आहे. एखाद्या चित्रपटात गुंड ज्या पद्घतीने वागतात, त्याच पद्घतीने जीवन जगण्याचा कल या मुलांचा आहे. आयुष्य घडविण्याच्या वयात ही मुले गुंडांना आपले आदर्श मानून त्यांच्या संपर्कात जात आहेत.

गांजा व इतर व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलांचा शोध ही गुन्हेगारांची टोळी घेते. कायम नशेत वावरणारी ही मुले टोळीच्या गळाला लागतात. त्यांच्याकडून आपसी खुन्नस काढून घेतल्यावर टोळीतील सदस्य आपला हेतू साध्य करताना दिसतात. अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीला गांजाची नशा सर्वाधिक कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.

यवतमाळ शहरातील मोकळी मैदाने, जंगल परिसरातील जागा गांजा सेवनासाठी सुरक्षित मानली जाते. या ठिकाणी गांजाचा धूर सोडल्यावर ही मुले गुन्हा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवृत्त होतात. विशेष म्हणजे, पालकांचे याकडे होणारे दुर्लक्ष चिंताजनक आहे. गांजाच्या विळख्यातून मुलांना बाहेर काढण्यासाठी पोलिस प्रशासनाने बड्या गांजा विक्रेत्यांच्या मुसक्या आवळणे आवश्यक झाले आहे.

अवधूतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वी गांजा सेवन करणाऱ्‍या मुलांविरुद्घ वेळोवेळी कारवाया करण्यात आल्या आहेत. अजूनही शहरातील काही भागात मुले गांजा सेवन करीत असल्याच्या तोंडी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार पॅट्रोलिंग करून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- मनोज केदारे, पोलिस निरीक्षक, अवधूतवाडी पोलिस ठाणे, यवतमाळ

(Cannabis-smoke-is-dangerous-for-minors)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT