Cannibal tiger still not found in rajura of chandrapur
Cannibal tiger still not found in rajura of chandrapur 
विदर्भ

वाघोबा लपलेय कुठे? ड्रोन; स्निफर डॉगची मदत घेऊनही सापडेना, कर्मचारी हतबल

आनंद चलाख

राजुरा (जि. चंद्रपूर): मध्य चांदा वन विभागाअंतर्गत राजुरा, विरुर वनपरिक्षेत्रातील नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. वनविभागाची रणनीती वाघाला समजल्याने वाघानेही मार्ग बदलले आहेत. आता वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या पथकासोबत ड्रोन व स्निपर डॉग गस्त घालणार आहे. दरम्यान, वनविभागाच्या नवनवीन प्रयोगांना वाघोबा हुलकावणी देत असल्यामुळे अधिकारी व कर्मचारी हतबल झाले आहेत.

नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्यानंतर वनविभागाने वाघाला पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली. नरभक्षी वाघाच्या शोधात वनविभागाची चमू जंगलात तळ ठोकून आहे . 200 कर्मचारी, 160 कॅमेरे, डॉक्‍टर, शूटर, पीआरटी पथक गस्त घालत आहे.  आतापर्यंत वेगवेगळे प्रयोग वन विभागाने केले. मात्र, हे सर्व प्रयोग वाघाच्या हुशारीमुळे फसलेले आहेत. आता वाघाचा सुगावा घेण्यासाठी वनविभागाने प्रशिक्षित डॉगस्कॉडमधील 'स्निपर डाग' व 'ड्रोन'ची मदत घेतली आहे.

मागील आठवड्यापासून स्निफर डॉग व ड्रोनच्या मदतीने जंगल पिंजून काढण्यात येत आहे. मात्र, नरभक्षी वाघानेही आपले मार्ग बदलले असल्याची माहिती समोर येत आहे. वाघाच्या नेहमीच्या मार्गावर ड्रोन गस्त घालत आहे. वनविभागाच्या रणनीतीचा सुगावा वाघाला लागलेला आहे. त्यामुळे तोही सावधगिरीने जंगलात फिरत आहे. राजुरा वनपरिक्षेत्राअंतर्गत चारही बाजूने पथकाने वेढले असल्याची माहिती आहे. 

राजुरा व विरुर वनपरिक्षेत्रात दहा शेतकरी व शेतमजुरांचा बळी घेणारा नरभक्षी वाघ अजूनही मोकाट आहे. त्यामुळे राजुरा तालुक्‍यातील दोन्ही वनपरिक्षेत्रतील शेतकरी दहशतीखाली आहे. परिसरातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. सणासुदीचे दिवस असल्यामुळे शेतावर जाणे व पिकाची काळजी घेतल्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. मात्र, वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT