patroling 
विदर्भ

पोलिस उपनिरीक्षकाची कॉलर पकडणे पडले त्याला महाग... वाचा मग काय झाले 

राजेश काळे

राळेगाव (जि. यवतमाळ) : रस्त्यावर गाडी उभी का केली, अशी विचारणा करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाची कॉलर पकडून त्यांच्यासोबत झटापट करण्यात आली. यात पोलिस उपनिरीक्षकांच्या शर्टचा खिसा फाटला. सोमवारी (ता. 13) दुपारी एक वाजताच्या सुमारास स्थानिक क्रांती चौक ते रावेरी पॉइंट सिमेंट रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली. 

कोरोना विषाणूचा ग्रामीण व शहरी भागात धोका वाढत चालला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर रस्त्यावर लोकांची गर्दी होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त सुरू आहे. कर्तव्यावर असलेल्या राळेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमोल मुडे हे आपल्या निवडक शिपायांसह पेट्रोलिंग करीत होते.

दरम्यान, एक चारचाकी वाहन त्यांना रस्त्यावर उभे दिसले. सदर वाहन कोणाचे याबाबत विचारणा करीत तेथे उभा असलेला नीलेश पुरुषोत्तम मानकर (वय 40, रा. यवतमाळ) याला चारचाकी वाहन रस्त्यावर ठेवू नका, बाजूला घ्या, अशी सूचना केली. मी वाहन बाजूला घेणार नाही, असे म्हणत त्याने पोलिस अधिकाऱ्याशी बाचाबाची केली. पोलिस उपनिरीक्षक मुळे यांनी त्याला पुन्हा रस्त्यावरून वाहन बाजूला घेण्यास सांगितले. मात्र, नीलेश मानकर काही ऐकण्याचा मनस्थितीत नव्हता. त्यावेळी पीएसआय व मानकर यांच्यात झटापट झाली. बाजूला असलेले पोलिस मदतीला धावले.

आरोपी मानकरला पकडून पोलिस ठाण्यात आणले. पीएसआय मुडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नीलेश मानकर याच्याविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. कर्तव्य बजावत असलेले पोलिस उपनिरीक्षक यावेळी सिव्हिल ड्रेसमध्ये होते हे विशेष. 


संपादन  : राजेंद्र मारोटकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke : मोदींना देव बनवून ठेवलंय... व्यवस्थेविरोधात युवकांची बंडखोरी! Cockroach Janta Party चे अभिजीत दिपके Exclusive

मान्सूनच्या वाऱ्यांनी जोडलंय भारत-टांझानिया नातं, एका भारतीय व्यापाऱ्याने घडवला इतिहास

Latest Marathi News Live Update : गांजा तस्करी प्रकरणी ५ जणांना अटक

Naneghat inscription: २१०० वर्षे प्राचीन नाणेघाट शिलालेख सुरक्षित; पुरातत्त्व विभागाकडून संरक्षण कवच बसवले, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संवर्धन..

KKR vs MI: मनिष पांडेचे दोन चौकार अन् हार्दिक पांड्याला आला राग, मात्र IPL कडून झाली शिक्षा! नेमकं घडलं काय?

SCROLL FOR NEXT