शुभांगी व वडिल विनाेद पाटील  
विदर्भ

कार वळविताना विहिरीत पडल्याने बापलेकीचा दुर्दैवी मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर(पुसद,जि. यवतमाळ) ः पुसद तालुक्‍यातील वालतूर रेल्वे येथील शेतातील विहिरीत कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार विहिरीत पडली. यात अपघातात वडील आणि मुलीचा मृत्यू झाला.ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

वालतूर रेल्वे येथील शेतकरी व मिनी दाळमिलचे संचालक विनोद दत्तराव पाटील (वय 45) व त्यांची मुलगी शुभांगी विनोद पाटील (वय19) हे शेतातील काम आटोपून इंडिका गाडीने घरी परत येत होते. दरम्यान, कार वळवित असताना नियंत्रण सुटून पुसनदीलगतच्या बंधाऱ्याजवळ असलेल्या दिनेश जाधव यांच्या शेतातील विहिरीत कार पडली. विहिरीत अंदाजे आठ फूट पाणी असल्याने व त्यातच कारचे दरवाजे आतून लॉक झाल्याने विनोद पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मुलगी शुभांगी बेशुद्ध अवस्थेत असल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादम्यान तिचाही मृत्यू झाला.

विनोद पाटील हे वालतूर रेल्वे येथील महिला सरपंच विशाखा पाटील यांचे वडील होत. तर बहीण मृतक शुभांगी ही श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयातील बी.एस्सी या पदवी अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी होती.

आम्ही हतबल झालो होतो

कार विहिरीत पडल्याचे समजताच गावकरी धावत निघाले. कुणी दोर घेतले तर कुणी आणखी काही साहित्य. ट्रक्टरच्या मदतीने कार बाहेर ओढण्याचे प्रयत्न केले पण त्यात यश मिळाले नाही. अखेर आम्ही कारच्या काचा फोडून दोघांना बाहेर काढले. मात्र, विनोद पाटील यांचा मृत्यू झाला होता तर बेशुद्धावस्थेत असलेल्या शुभांगीला रूग्णालयात दाखल केले. मात्र, तिचाही जीव वाचू शकला नाही, असे घटनास्थळावर उपस्थित असलेले वालतूर येथील शेतकरी विशाल विजयराव गायकवाड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar Crime : पत्नी-पतीचा वाद; अकरावर्षीय मुलाला पळविले, पतीसह त्याच्या तीन मित्रांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मराठवाड्यात पीक कर्जवाटपाचा वेग मंदावला

Software Engineer Cyber Crime Scam : सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणी ठरली सायबर फसवणुकीची शिकार; 50 लाखाला फसविले, मैत्रिणीलाही ओढले जाळ्यात

Chhatrapati Sambhajinagar Crime : तू मेरी नहीं तो किसी और की भी नहीं...

Gold Rate Today : सोनं-चांदी कोसळली! जानेवारीत पहिल्यांदाच एवढी मोठी घसरण, पाहा आजचे भाव

SCROLL FOR NEXT