catering
catering 
विदर्भ

हजारो झाले बेरोजगार! कॅटरिंग व्यवसायाला टाळेबंदीमुळे टाळे

चेतन देशमुख

यवतमाळ : कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी शासनाने स्वागत सोहळे, लग्न समारंभ, सार्वजनिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. त्यामुळे या ठिकाणी हजारो लोकांच्या जेवणावळी उठविणारे कॅटरिंग व्यावसायिक, मंडप डेकोरेशन व्यावसायिकांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे.

कोरोना लॉकडाउनमुळे लग्नसमारंभ व इतर मोठे कार्यक्रम रद्द झाले आहेत. परिणामी, कॅटरर्स व मंडप व्यवसायात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कार्यरत असलेले जिल्ह्यातील हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. कोरोनामुळे दिवाळीपर्यंत मोठे समारंभ होण्याची शक्‍यता कमीच आहे. या काळात दहा कोटी रुपयांचा फटका या व्यवसायाला बसण्याची शक्‍यता आहे. यापेक्षाही गेल्या तीन महिन्यांपासून या कामावर अवलंबून असलेल्या जिल्ह्यातील जवळपास पाच हजार नागरिकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. मंडप व कॅटरिंग या दोन्ही व्यवसायांत तरुणांची संख्या मोठी आहे. त्याचा फटका तरुणांना बसला आहे.

लग्न, वाढदिवस व अनेक प्रकाराचे छोटे-मोठे समारंभ मंडप, कॅटरर्स यांच्याशिवाय होत नाहीत. सध्या तर अनेक कार्यक्रमांतील जेवणावळीचा ठेका देण्याची पद्धत सुरू झाली आहे. धान्यापासून ते जेवणापर्यंत सर्व एकालाच देऊन घरचे कर्ते मोकळे राहण्याचा प्रयत्न करतात. परंतु, यंदाचे वर्ष मंडप, कॅटरिंग व मंगलकार्यालय व्यावसायिकांसाठी अडचणीचे ठरले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात या व्यवसायाशी संबंधित जवळपास पाच हजार कामगार आहेत. यंदा धार्मिक, राजकीय व सामाजिक कार्यक्रमांपासून नवरात्री, गणेशोत्सव, घरगुती मंगलकार्यालये आदींवर गदा आली आहे. केंद्र सरकारने लॉकडाउन लागू केल्यानंतर सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. अनेकांनी मंगलकार्यालय, मंडप डेकोरेशन व कॅटरर्सला दिलेले ऍडव्हान्स परत घेतले आहेत.

कोरोनाच्या रुग्णांत सतत वाढ होत असल्याने येत्या काळातही समारंभ होण्याची शक्‍यता धूसर आहे. या काळात अनेक व्यावसायिक कर्जात बुडाले आहेत. सीझन असल्याने अनेकांनी लाखो रुपयांची खरेदी केली होती. परंतु, आवक बंद झाल्याने निराशा झाली आहे. शिवाय बाहेर राज्यातील आचारी व कामगार परत गेले आहेत. त्यामुळे लॉकडाउनचा फटका मंडप, मंगलकार्यालय व कॅटरिंग व्यवसायाला बसला आहे. यवतमाळ जिल्ह्यात 200 कॅटरर्स असून त्यांच्याकडे 3000 महिला कामगार 3000 पुरुष कामगार काम करतात.

कामगारांवर बेरोजगारी
कोरोनामुळे मंगल कार्यालयचालक आर्थिक संकटात सापडले आहेत. केवळ 50 लोकांसाठी परवानगी आहे. मात्र, ग्राहक तेवढा खर्च करीत नाहीत. परिणामी आमच्या व्यवसायाशी संबंधित असलेल्या कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने आकारला जाणारा कर व वीजबिल कपात करावी.
प्रदीप वादाफळे, संचालक, एम. डब्यू. पॅलेस, यवतमाळ.

उपासमारीची वेळ
कॅटरिंग व्यवसायात स्पर्धा निर्माण झाली आहे. या व्यवसायात नव्याने आलेल्या तरुणांना परिश्रम घ्यावे लागत आहेत. त्यातच कोरोनामुळे रोलिंगवर आलेल्या गाडीला ब्रेक लागला आहे. उन्हाळ्याचा सीझन कॅटरर्सचालकांच्या हातून गेला आहे. आणखी काही महिने संसर्गाचा प्रादुर्भाव राहण्याची शक्‍यता आहे. त्याचा फटका व्यावसायिकांना तर बसलाच आहे. याशिवाय, त्यावर अवलंबून असलेल्या जवळपास पाच हजार नागरिकांनादेखील बसला असून, अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कर्ज काढून व्यवसाय सुरू करणाऱ्यांना कर्जप्रक्रियेत शिथिलता द्यावी.
चेतन नराडवार, संचालक, श्री जगदंबा केटरर्स, यवतमाळ.

कामगारही अडचणीत
हंगामासाठी बनविलेले साहित्य, मजुरांना दिलेली रक्कम, बॅंकेचे कर्जाचे हप्ते अशा अनेक संकटांना मंडप डेकोरेशनचालकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या व्यवसायाला उद्योगाचा दर्जा देणे आवश्‍यक आहे. वर्षभर कामे नसल्याने संकट ओढवले आहे. कामगारही अडचणीत आहेत. त्यामुळे शासनाने योग्य ती मदत करावी.
पवन माहेश्‍वरी, यवतमाळ मंडप डेकोरेटर्स, कॅटरर्स संघटना.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: शाहरुख खानचे दमदार अर्धशतक, गुजरातने पार केला 120 धावांचा टप्पा

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT