Central Cotton Research team came in yavatmal district  
विदर्भ

केंद्रीय कापूस संशोधन पथक मारेगावात दाखल; बोंडसड, बोंडअळीग्रस्त पिकांची पाहणी

सुमीत हेपट

मारेगाव (जि. यवतमाळ) : कपाशी पिकावर बोंडसड व गुलाबी बोंडअळीने आक्रमण केले. त्यामुळे कपाशी पीक उद्‌ध्वस्त झाले. केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे संचालक वाय. जी प्रसाद यांनी आपल्या पथकासह मारेगाव येथे भेट देत पिकांची पाहणी केली.

अवकाळी पावसाने आधीच कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बोंडे सडून गेली आहेत. हे संकट जात नाही, तोच गुलाबी बोंडअळीने मोठ्या प्रमाणात आक्रमण केले. त्यामुळे 31 हजार 638 हेक्‍टर क्षेत्रामधील कपाशी बाधित झाली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागात सर्वाधिक कपाशीचे उत्पादन घेतले जाते. 

लांब धाग्याच्या कपाशीमुळे मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सुरुवातीला कपाशीचे अतिशय चांगले पीक होते. परंतु, सप्टेंबर व आक्‍टोबर महिन्यांच्या सुरुवातीच्या झालेल्या परतीच्या सततच्या पावसामुळे कपाशीची वाट लागली. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या चमूने बोटोनी येथील शेतकरी बाळाभाऊ पाटील यांच्या शेतात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. शिवाय यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर, उपविभागीय कृषी अधिकारी जे. आर. राठोड, कीटकशास्त्रज्ञ डॉ. व्ही. चिंनाबाबू नाईक, डॉ. दीपक नगराळे, कृषी अधिकारी आर. डी. पिंपरखेडे कृषी अधिकारी, ए. एम. बदखल, एस. के. निकाळजे, ए. एस. बरडे आदी उपस्थित होते.

संपादन -  अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वसई किल्ल्यावर शिवरायांच्या पोषाखात फोटो काढताना अडवलं, हिंदी भाषिक सुरक्षा रक्षकाचा मराठीत बोलण्यास नकार; VIDEO VIRAL

AUS vs IND 2nd ODI: विराट कोहली पुन्हा शून्यावर बाद, १७ वर्षांत पहिल्यांदाच 'असं' घडलं; शुभमन गिलही स्वस्तात आऊट

Govardhan Puja: गोवर्धन पूजनासाठी CM योगी गोरखनाथ मंदिरात; गायींना खाऊ घातले गूळ-रोटी, म्हणाले: 'गोवंश भारताच्या समृद्धीचा आधार!'

Ayodhya: थंडीमुळे रामललांच्या दर्शन आणि आरतीच्या वेळेत बदल; ट्रस्टने जाहीर केली नवी वेळ

बातम्या पेरून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आलेला, आता घोटाळ्यातून वाचण्यासाठी माझ्याबद्दल खोटं पसरवतोय; धंगेकरांची आणखी एक पोस्ट

SCROLL FOR NEXT