Amt city 
विदर्भ

ब्रेकिंग : अमरावतीत आणखी सात कोरोनाबाधित आढळले

सकाळवृत्तसेवा

अमरावती : अमरावती : अमरावतीत गुरुवारी सकाळी आणखी सात कोरोनाबाधित आढळून आल्याने एकूण रुग्णांचा आकडा आता ३८९ वर पोहोचला आहे. 

गुरुवारी सकाळी आढळून आलेल्या कोरोनाबाधितांमध्ये बडनेरा येथील मारवाडीपूर भागातील 10 वर्षीय मुलगा, म्हाडा कॉलनी, न्यू टाऊन बडनेरा येथील 19 वर्षीय मुलगा, जयनगर, बायपास रोड येथील 42 वर्षीय पुरुष, भाजी बाजार येथील १९ वर्षीय मुलगा, रोहनखेड येथील 33 वर्षीय महिला, किरणनगर गल्ली क्रमांक २ येथील 22 वर्षीय युवक तसेच मारवाडीपुरा बडनेरा येथील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्याचा आकडा आता  ३८९ वर पोहोचला आहे.

श्रीसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून बुधवारी आरोग्य यंत्रणेला प्राप्त झालेल्या अहवालानुसार पहिल्या टप्प्यात स्थानिक गोपालनगर येथील 52 वर्षीय पुरुष, चमननगर (बडनेरा) येथील अनुक्रमे 14 व 17 वर्षीय मुले आणि 31 वर्षीय महिला, बडनेरा मार्गावरील 20 वर्षीय युवक, जुनी वस्ती बडनेरा येथील 43 वर्षीय व्यक्तीसह धनराज लेन सक्करसाथ येथील 3 वर्षीय बालिका, साबणपुरा येथील 29 वर्षीय युवक, स्थानिक दस्तूरनगर भागातील मालू-तलडा ले-आउट येथील 33 वर्षीय, अशा एकूण नऊ व्यक्तींचा कोरोना अहवालसुद्धा पॉझिटिव्ह आलेला आहे. दुसरीकडे बडनेरा येथील कोरोना बाधितांची वाढती संख्या नागरिक आणि प्रशासनाची चिंता वाढविणारी ठरत आहे. 

आठ रुग्णांना बुधवारी मिळाला डिस्चार्ज 
जिल्हा कोविड रुग्णालयात उपचाराअंती बरे झालेल्या आठ व्यक्तींना बुधवारी (ता. 17) डिस्चार्ज देण्यात आला. यात सहा महिला, वडाळी येथील 65 वर्षीय वृद्ध आणि जयस्तंभ चौकातील आठ वर्षीय बालकाचा समावेश आहे. संबंधित महिला रुक्‍मिणीनगर, चावडी चौक-बडनेरा, किशोरनगर, यशोदानगर, अन्सारनगर या भागातील आहेत. आतापर्यंत बरे होऊन डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या 256 झालेली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''शेण कुणी खाल्लं हे संजय राऊतांना विचारा'', सुषमा अंधारेंच्या 'त्या' टीकेला काँग्रेसचं उत्तर...

Alephata News : शेतकरी पुत्राची कृषी अधिकारीपदी झेप; आळे येथील आदित्य तितरचे यश

Bhor Crime : भोरमध्ये दरमहा चार तरुणींचे पलायन; पोलिसांसमोर आव्हान, पाच वर्षांत आठ महिला बेपत्ता

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT