chances of rain with heavy storm in yavatmal 
विदर्भ

वादळासह अवकाळी पावसाचे संकट; गहू, हरभऱ्यासह फळबागांना धोका

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : हवामान संस्थेच्या अंदाजानुसार मध्य भारतातील विपरीत चक्रवातामुळे दोन्हीकडील समुद्रातून आद्रता घेऊन येणारे वारे वाहू शकतात. परिणामी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. सध्या शेतकऱ्यांचे तूर आणि हरभरा काढणी सुरू आहे. अशा परिस्थितीत अवकाळी पाऊस आल्यास कापूस, सोयाबीनंतर तूर तसेच हरभरा पिकांचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे.

जिल्ह्यात या आठवड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. खरीप हंगामात पावसाने कापूस, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सध्या शेतकऱ्यांना तूर तसेच हरभरा पिकांकडून अपेक्षा होती. मात्र, आता जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार 16 ते 18 फेब्रुवारी या दोन दिवसांत वादळी पावसाचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राने केले आहे. वादळ आल्यास लोकांनी झाडाखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे. पाऊस आल्यास शेतकऱ्यांनी भाजी पिकांवर बुरशीनाशकाची फवारणी करावी. त्याआधी भाजीपाल्याची तोडणी करून घ्यावी व फवारणी केल्यानंतर किमान आठ दिवस तरी भाजीपाला तोडू नये, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी जागरूक राहून योग्य ती काळजी घ्यावी. हरभरा कापणीला आल्यास कापून ढीग करून व्यवस्थित झाकून ठेवावे. पावसामुळे हरभऱ्याचे घाटे जमिनीवर पडून मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. आंबा बागेतील पडलेले मोहरी किंवा लहान आंबे उचलून नष्ट करावेत, जेणेकरून रोगांचे अवशेष त्याद्वारे नष्ट होईल.
-डॉ. प्रमोद यादगीरवार, सहयोगी संशोधन संचालक, मध्य विदर्भ विभाग.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प युद्ध संपवण्यासाठी आतुर ! अमेरिकेने इराणला पाठवला १५ कलमी शांतता प्रस्ताव, काय आहेत अटी ?

Latest Marathi News Live Update : हडपसर परिसरातील कालवा फुटी प्रकरणी जलसंपदामंत्र्यांकडून अभियंत्यांना नोटीस

Chhatrapati Sambhajinagar: हॉटेल सहा हजार, सिलिंडर बाराशेच! हिशेब जुळेना ; पथके करतात तरी काय?

Ashok Kharat Case Update : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यावर मोठी कारवाई, प्रशासनात खळबळ !

Chhatrapati Sambhajinagar:अयोध्येच्या मंदिराची प्रतिकृती शहरात; धार्मिक वातावरणाची निर्मिती

SCROLL FOR NEXT