Chandrapur sakal
विदर्भ

Chandrapur Crime : वरोरा शहरात सेक्स रॅकेट उघड; दहा जण ताब्यात

बेपत्ता व्यक्तीचा तपास करीत असतानाच पोलिसांना एक अल्पवयीन मुलगी संशयास्पद स्थितीत आढळून आली

सकाळ वृत्तसेवा

सकाळ वृत्तसेवा

वरोरा - बेपत्ता व्यक्तीचा तपास करीत असतानाच पोलिसांना एक अल्पवयीन मुलगी संशयास्पद स्थितीत आढळून आली. तिला ताब्यात घेत पोलिसांनी चौकशी केली. चौकशीत शहरात देह व्यापार चालत असल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवून दहा जणांना ताब्यात घेतले.

शुक्रवार (ता. ४) सायंकाळच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी शहरात संशयास्पदरीत्या वावरताना आढळली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन विचारपूस केली. तिला एका व्यक्तीने ग्राहकाला भेटण्याकरिता पाठविल्याचे तिने सांगितले.

पोलिसांनी लगेच सूत्रे हलवली आणि तिच्याकडून व्यवसाय करून घेणाऱ्या एका महिलेसह पुरुष एजंटाला पोलिसांनी ताब्यात घेतली. त्याचीही चौकशी केली.

या चौकशीत त्यांनी काही ग्राहकांची नावे सांगितली. यावरून पोलिसांनी नऊ व्यक्तींना अटक केली.दरम्यान, याप्रकरणात उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपाणी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, यातील सर्व ग्राहक आणि आरोपींचा पंचनामा सुरू आहे.

त्यांच्यावर अत्याचार, बालअत्याचार प्रतिबंधक कायदा आणि पिटा अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी अल्पवयीन मुलीची रवानगी बालसुधार गृहात केली आहे. यातील आरोपी महिला, एजन्ट आणि ग्राहकांची चौकशी करण्याकरिता आठ अधिकाऱ्यांची विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याचे नोपाणी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune land deal: मुंढवा जमीन गैर व्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना क्लिन चीट, दोषी कोण? अहवालात काय म्हटलं?

नेवासे तालुका हादरला! 'सदस्यांच्या छळाला कंटाळून पदाधिकाऱ्याने जीवन संपवले'; शिक्षण संस्थेच्या सहा सदस्यांवर गुन्हा, चिठ्ठीत काय दडलयं?

Latest Marathi Breaking News Live Update : 'आमच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड सर्वसंमतीने केली जाईल'- भाजप नेते तारकिशोर प्रसाद

Kolhapur Politics : संजय पाटील यड्रावकर आणि राजू शेट्टींचे पीए स्वस्तिक पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी, "तुमचा काय संबंध"; नगपरिषदेतच हाय व्होल्टेज ड्रामा

Pune News :...तर पुण्यात संध्याकाळी ७ पर्यंतच पेट्रोल पंप सुरु ठेऊ; पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा थेट इशारा, कारण काय?

SCROLL FOR NEXT