tiger
tiger sakal
विदर्भ

चंद्रपूर : आधी शिकार, मग अवयव काढून वाघाला जाळले

सकाळ वृत्तसेवा

पोंभुर्णा (जि. चंद्रपूर) : तालुक्यातील भटाळी येथील वाघाच्या शिकार प्रकरणातील आरोपींकडून दहा वाघनखे, मिशीचे सहा केस, दात आणि हाडे जप्त करण्यात आली आहेत. बुटीबोरी वनविभागाच्या पथकाने भटाळी येथे तीन जणांना वाघाच्या शिकार प्रकरणात ताब्यात घेतले आहे. वाघाच्या शिकारीनंतर त्याचे महत्त्वाचे अवयव काढून त्याला जाळून टाकण्यात आले. अटकेतील आरोपींनी आणखी काही शिकार केली असावी, या दिशेने वनविभागाचा तपास सुरु आहे.

९ सप्टेंबरला पोंभूर्णा भटाळी येथील योगेश तोडासे याला वाघाच्या अवयवाची विक्री करताना बुटीबोरी येथे ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई बुटीबोरी प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकड यांनी केली. अटकेतील योगेश याने वाघाची शिकार आणि त्यात सहभागी काही आरोपींची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोंभुर्णा वनपरिक्षेत्राधिकारी फणींद्र गादेवार, राजुरा वनपरिक्षेत्राचे फिरते पथकाचे वनकर आणि कर्मचारी यांनी आज १० सप्टेंबरला भटाळी गाठून दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १० वाघनखे, मिशीचे सहा केस, दात आणि हाडे जप्त करण्यात आली.

पथक सिंदेवाहीला रवाना

विजेचा धक्का देऊन वाघाची शिकार करण्यात आली. त्यासाठी वापरला गेलेला तारसुद्धा जप्त करण्यात आला. शिकारीनंतर वाघाचे महत्त्वाचे अवयव काढून त्याला जाळून टाकण्यात आले. या आरोपींच्या अटकेने वन्यप्राण्यांची शिकार करणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. भटाळीच्या वाघाच्या शिकार प्रकरणाचे तार सिंदेवाही परिसरात जुळले आहे. त्याची चौकशी करण्यासाठी एक पथक सिंदेवाहीला रवाना झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde Audio: "पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लीपची चौकशी करा"; बजरंग सोनावणेंची निवडणूक आयोगाकडं मागणी

T20 World Cup 2024: भारतात वर्ल्ड कप सामने पाहाता येणार फ्री! पण कोणाला आणि कसे घ्या जाणून

RIMC Entrance Exam : राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजमधील प्रवेशाची पात्रता परीक्षा आता ८ जूनला

Sanjay Nirupam: "पवारांनी काँग्रेसकडं प्रस्तावही ठेवला होता की, सुप्रिया सुळेंना..."; विलिनीकरणाच्या विधानावर निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

Latest Marathi News Live Update : अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर शुक्रवारी येणार आदेश

SCROLL FOR NEXT