chandrapur GMC threatens to corona fighters for job  
विदर्भ

कोरोना योद्ध्यांना नोकरीवरून काढण्याची धमकी, थकीत पगाराच्या मागणीनंतर वैद्यकीय महाविद्यालयाची मुजोरी

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० कोविड योद्धे कामगारांनी ७ महिन्यांचा थकीत पगार व दोन वर्षांपूर्वी लागू झालेले किमान वेतन देण्यात यावे, या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील ५५ दिवसांपासून डेरा आंदोलन सुरू केले आहे. राज्य शासनाने पगार देण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. उलट कामगारांना कामावरून कमी करण्याची धमकी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने नोटीसीतून दिली आहे. 

राज्य शासनाने कामगारांचे थकीत वेतन न दिल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. यापूर्वीच प्रदीप खडसे व संगीता पाटील या दोन कामगारांचा थकीत पगार व मानसिक तणावामुळे मृत्यू झालेला आहे. अशात वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेत कामावरून कमी करण्याची नोटीस बजावली आहे. सुरक्षारक्षक, कक्षसेवक, सफाई कामगार इत्यादींच्या नावासह एक यादी 3 एप्रिलच्या रात्री शासकीय रुग्णालयातील अपघात विभागाच्या बाजूला असलेल्या मेट ऑफीस समोर लावण्यात आली. आंदोलनकर्त्या कामगारांनी २४ तासांच्या आत कामावर रुजू व्हावे, अन्यथा त्यांना कामावरून काढण्यात येईल, असा धमकीवजा इशारा या नोटीसमध्ये देण्यात आलेला आहे. 

दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या या नोटिसबद्दल जनविकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख तसेच आंदोलनातील कामगारांनी संताप व्यक्त केलेला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन पगार देण्याबाबत ठोस निर्णय घेत नाही. मात्र, कामगारांना कामावरून काढण्याची धमकी देत आहे. वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाची मुजोरी खपवून घेणार नाही, असे पप्पू देशमुख यांनी म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT