Chandrapur Lok Sabha 2024 esakal
विदर्भ

Chandrapur Lok Sabha 2024: भाजप प्रचारात अन्‌ काँग्रेस दिल्लीत व्यग्र, सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारास प्रारंभ!

Chandrapur Lok Sabha 2024: लोकसभा निवडणुकीचे नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असतानाही काँग्रेसच्या उमेदवारीचा घोळ अद्याप संपलेला नाही.

सकाळ वृत्तसेवा

Chandrapur Lok Sabha 2024: लोकसभा निवडणुकीचे नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असतानाही काँग्रेसच्या उमेदवारीचा घोळ अद्याप संपलेला नाही. दुसरीकडे राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भाजपने लोकसभेच्या रिंगणात उतरवून प्रचाराला प्रारंभ केला आहे. काँग्रेसचा वडेट्टीवार गट आणि सुरेश धानोरकर गट दिल्लीला पोहचला आहे. महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे पदाधिकारी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या पाठीशी उभे आहेत.

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी मुलगी शिवानीचे नाव समोर केल्यानंतर काँग्रेस महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी त्याला कडाडून विरोध केल्याने वडेट्टीवार एकटे पडले आहेत. त्यामुळे आता वडेट्टीवार यांच्याकडून दुसऱ्या नावाची चाचपणी केली गेली. त्यातून वणीचे माजी आमदार वामनराव कासावार यांचे नाव समोर करण्यात आले. परंतु त्यांच्या नावाला प्रतिसाद न मिळाल्यामुळे राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे यांचे नाव आता पुढे केले गेले आहे. मात्र आपण लोकसभा लढणार नाही. धानोरकरांना उमेदवारी मिळाली पाहिजे, यासाठी दिल्लीला जात असल्याचे धोटे यांना सांगितले.

धानोरकर यांच्या बाजूने जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुभाष धोटे, काँग्रेस समर्थित आमदार सुधाकर अडबाले, पदवीधर मतदार संघातून निवडून आलेले अभिजित वंजारी, माजी मंत्री शिवाजीराव मोघे तसेच शिवसेना, राष्ट्रवादी, आप, समाजवादी पक्षाचे जिल्हाप्रमुख उभे आहेत. पतीच्या निधनानंतर काँग्रेसच्या परंपरेप्रमाणे सहज उमेदवारी मिळेल, अशी आमदार प्रतिभा धानोरकरांना अपेक्षा होती. मात्र त्यांना आता उमेदवारीसाठी बरीच दमछाक करावी लागत आहे. त्या समर्थकांसह दिल्लीला गेल्या असून सोनिया गांधींनी त्यांना भेटण्याची वेळ दिली आहे.

काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून अशी सुंदोपसुंदी सुरू असताना भाजपने मात्र प्रचाराचा नारळ फोडला आहे. मुनगंटीवार छोट्या-मोठ्या बैठका, प्रचार सभा घेत आहे. मुनगंटीवार आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्यात फारसे सख्य नाही. त्यामुळे अहिरांची भूमिका या निवडणुकीत काय असेल, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार आणि मुनगंटीवार यांच्यातूनही विस्तव जात नाही. जोरगेवार महायुतीत आहे. जोरगेवार मुनगंटीवार यांच्या प्रचाराला उतरतील काय, याबाबत सांशकता आहे. (Loksabha Update)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today: दसऱ्यानंतर सोन्याच्या भावात घसरण; चांदीत वाढ कायम, काय आहे आजचा भाव?

गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यूचं गुढं उलगडलं, स्कुबा डायव्हिंग नाही तर हे होतं मोठं मृत्यूचं कारण, पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा ‘Azad Kashmir’चा नारा; माफी मागायची सोडून आपलीच टिमकी मिरवतेय...

'तुम्हाला I Love Modi म्हटलं तर चालतं, मग I Love Mohammad म्हटलं तर वाद का?' ओवेसींचा थेट सवाल, मोदींसह RSS वर जोरदार निशाणा

Kantara Chapter 1 Box Office : 'कांतारा चॅप्टर 1' वादळ! पहिल्या दिवशी केली तब्बल 'इतक्या' कोटींची कमाई, छावा-सैयारासह 10 चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT