Chandrapur Lok Sabha 2024
Chandrapur Lok Sabha 2024 Esakal
विदर्भ

Chandrapur Lok Sabha 2024: अन्यथा चंद्रपूरसुद्धा काँग्रेस गमावणार? मुनगंटीवारांसाठी विजयाचा मार्ग सुकर पण..

अंकिता खाणे (Ankita Khane)

Chandrapur Lok Sabha 2024: चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात भाजपने सुधीर मुनगंटीवार यांना रिंगणात उतरविले. काँग्रेसचा उमेदवार जाहीर व्हायचा आहे. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी मिळाली तरच तुल्यबळ लढत अपेक्षित आहे. अन्यथा भाजपचा विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो, असा अंदाज जाणकारांचा आहे. या लोकसभा क्षेत्रात दोन काँग्रेस, तीन भाजप आणि सध्या सत्ताधाऱ्यांसोबत असलेला एक अपक्ष आमदार आहे. ओबीसींची संख्या लक्षणीय आहे. त्यात कुणबी समाजाच्या मतदारांचा वाटा निर्णायक आहे.

२०१९चे चित्र

बाळू धानोरकर (काँग्रेस) विजयी मते : ५,५९, ५०७

हंसराज अहीर (भाजप) मते : ५,१४, ७४४

राजेंद्र महाडोळे (वंचित) मते : १,१२, ०७१

सुशील वासनिक (बसप) मते : ११,८१०

विजयी उमेदवारांचे मताधिक्य : ४४,७६३

वर्चस्व

२००४ : भाजप

२००९ : भाजप

२०१४ : भाजप

२०१९ : काँग्रेस

सद्य:स्थिती

मविआचा उमेदवार अद्याप निश्चित नाही. आमदार धानोरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार पक्षांच्या आदेशामुळे रिंगणात.

भाजप आणि काँग्रेस यात अंतर्गत धुसफूस.

ओबीसी मते निर्णायक ठरणार

अपक्ष आमदार किशोर जोरगेवार आणि मुनगंटीवार यांच्यातील वैरत्व मिटणार काय, याकडे लक्ष.

हे प्रभावी मुद्दे

प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी मिळाल्यास पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात महिला उमेदवार असतील.

मुनगंटीवार सलग निवडून येत आहेत.त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव मतदारसंघात आहे.

विमानतळ, वेकोलीचे भूमिअधिग्रहण, प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराचा प्रश्न कळीचा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT