Chandrapur Murder person killed over farm dispute Poured alcohol and threw it in the river sakal
विदर्भ

Chandrapur Murder: शेतीच्या वादातून कोतवालाची हत्या; दारू पाजून फेकले नदीत

Latest Vidarbha Crime: १३ सप्टेंबर रोजी भाऊ संजय खोब्रागडे यांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत केली.

सकाळ वृत्तसेवा

Maharashtra latest Update: गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कोतवाल नंदकिशोर हिरामण खोब्रागडे याचा मृतदेह उमानदीच्या काठावर आढळून आला. शेतीच्या वादातून कोतवालास मद्यप्राशन करून नदीत ढकलून देण्यात आले.

याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. एक आरोपी पसार आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिंदेवाही तालुक्यातील सरडपार येथील कोतवाल नंदकिशोर हिरामण खोब्रागडे हे १२ सप्टेंबर रोजी घरून निघाले. मात्र, त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाही. त्यांचा सिंदेवाही शोध घेण्यात आला. मात्र, त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे १३ सप्टेंबर रोजी भाऊ संजय खोब्रागडे यांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत केली.

पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी केली. त्यात नंदकिशोर खोब्रागडे हे दोन व्यक्तीसोबत दुचाकीने जाताना दिसले. त्यानंतर चारचाकी वाहनाने नंदकिशोर खोब्रागडे मूलच्या दिशेने निघाले. या मार्गावर असलेल्या एका बारमध्ये त्यांनी मद्यप्राशन केल्याचे सीसीटीव्ही कॅमेरातून दिसले. १४ सप्टेंबर रोजी नंदकिशोर यांच्या कुटुंबांनी डॉ. नामदेव धनविजय यांचे नाव घेतले.

त्यांच्या संशयावरून पोलिसांनी धनविजय याला अटक केली.

त्यांची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्याने चौकशी सोपान जिल्हारे याचे नाव घेतले. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. दोघांचाही पीसीआर घेण्यात आला. त्यात तिसरा आरोपी प्रशांत कुंभरे याचेही नाव समोर आले. पोलिसांनी शनिवारी त्याला अटक केली. प्रशांतची चौकशी केली असता त्याने संपूर्ण घटना सांगितली. नंदकिशोर खोब्रागडे यांची शेती आहे. हा वाद डॅा. धनविजय यांच्याशी संबंधित होता. त्यातूनच हे हत्याकांड घडले.

याप्रकरणी पोलिसांनी नामदेव धनविजय, सोपान जिल्हारे आणि प्रशांत कुंबरे याला अटक केली. यातील एक आरोपी पसार आहे. त्याचा शोध पोलिस घेत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोंबरे यांनी दिली. याप्रसंगी पोलिस निरीक्षक विजय राठोड, सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश मेश्राम उपस्थित होते.

कामाचे निमित्त करून नेले बाहेर

नंदकिशोर खोब्रागडे याला त्याच्या घरातून काही कामानिमित्त बाहेर नेले. बाहेर त्याला दारू पाजण्यात आली. अतिमद्य प्राशन करून त्याला उमानदीच्या काठावर ढकलून देण्यात आले. रविवार (ता. २२) सकाळी उमा नदीजवळ अडीच किमी अंतरावर एका खोडक्याला नंदकिशोर यांचा मृत्यूदेह कुजल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर त्याच्या कुटुंबाला बोलावून त्यांची ओळख पटविण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT